भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी (दि. 05 सप्टेंबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. दीर्घ काळाच्या दुखापतीनंतर आशिया चषक 2023 स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचाही विश्वचषकाच्या संघात समावेश आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत 6 खेळाडू असेही आहेत, जे पहिल्यांदाच वनडे विश्वचषक खेळणार आहेत. मात्र, काहींना संधी मिळाली नाही. अशात पत्रकार परिषदेदरम्यान अशी काही घटना घडली, ज्यामुळे कर्णधार रोहित शर्मा याला राग अनावर झाला.
अलीकडेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तिलक वर्मा (Tilak Varma) याला आणि दीर्घ काळानंतर संघात सामील झालेल्या संजू सॅमसन (Sanju Samson) यांना विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेसाठीच्या संघात जागा मिळाली नाही. बीसीसीआयचे निवडकर्ते अजित आगरकर यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत संघाची घोषणा केली. अशात पत्रकार परिषदेदरम्यान विचित्र घटना घडली, ज्यात रोहित रागाने लाल झाल्याचे दिसला.
नेमकं काय घडलं?
झाले असे की, कर्णधार रोहित शर्मा याला बाहेर सुरू असलेल्या गोष्टींबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहितने उत्तर देत म्हटले, “जेव्हा आम्ही भारतात पत्रकार परिषद घेऊ, तेव्हा मला विश्वचषकातही असे प्रश्न विचारत जाऊ नका. आम्ही बाहेरच्या गोष्टींवर लक्ष देऊ इच्छित नाहीत. मी आधीही अनेकदा सांगितलं आहे, की आम्ही त्या गोष्टींवर लक्ष देत नाहीत. मी त्या प्रश्नांची उत्तरे देणार नाही.”
Rohit Sharma just owned a journalist 😂https://t.co/dTevaW6iJg
— R A T N I S H (@LoyalSachinFan) September 5, 2023
कधी होणार विश्वचषकाला सुरुवात?
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला पुढील महिन्यात 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ भाग घेणार असून 45 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वनडे विश्वचषक 2023साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल (captain rohit sharma loses temper during team india squad announcement for odi world cup 2023)
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! 15 सदस्यीय संघ घोषित करताच बसला झटका, ‘हा’ स्टार खेळाडू World Cupनंतर होणार निवृत्त
भारताचे ‘हे’ 6 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार वनडे वर्ल्डकप, यादीत स्टार क्रिकेटर्सचा समावेश; पाहा यादी