---Advertisement---

‘तर रोहित शर्माने 20 सिक्स मारले असते’, दक्षिण आफ्रिकेला डिवचत शोएब अख्तरचे मोठे विधान

On: सोमवार, नोव्हेंबर 6, 2023 12:38 PM
Rohit-Sharma-And-Shoaib-Akhtar
---Advertisement---

भारतीय संघ किंवा संघाच्या एखाद्या खेळाडूने चमकदार कामगिरी केली, तर त्याच्यावर जगभरातून अभिनंदनाचा पाऊस पडतो. यामध्ये पाकिस्तानच्या माजी दिग्गजांचाही समावेश असतो. अशात भारतीय संघाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली विश्वचषक 2023 स्पर्धेतील 37वा आणि आपला आठवा सामना रविवारी (दि. 05 नोव्हेंबर) जिंकला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 243 धावांनी पराभवाचा धक्का दिला. भारताच्या विजयानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने रोहितविषयी मोठी प्रतिक्रिया दिली. आता सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे.

काय म्हणाला अख्तर?
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने या सामन्यात भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्याने 24 चेंडूत 40 धावांची विस्फोटक खेळी केली. त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. रोहित आणि संघाविषयी मोठी प्रतिक्रिया देत शोएब अख्तर (Shoaib Akhtar) म्हणाला, “रोहित शर्माकडे प्रत्येक शॉट आहे. जर तबरेज शम्सी याने असे चेंडू जर रोहित शर्माला टाकले असते, तर रोहितने त्याला 15 ते 20 षटकार मारले असते. रोहित जर आणखी काही षटके खेळला असता, तर भारताची धावसंख्या 430 हून अधिक झाली असती.”

रोहितच्या शतकांविषयी बोलताना अख्तर म्हणाला की, “या विश्वचषकात रोहित शर्मा 5 शतकांना मुकला आहे. तो नि:स्वार्थी खेळाडू आहे. तो संघासाठी खेळतो.”

रोहितची स्पर्धेतील कामगिरी
रोहित शर्मा याच्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 8 सामन्यात खेळताना 55.25च्या सरासरीने 442 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 2 अर्धशतकेही निघाली आहेत. 131 ही त्याची स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. (captain rohit sharma would have smashed him for 20 sixes shoaib akhtar brutally slams south africa bowler)

हेही वाचा-
‘…म्हणून तुमच्याकडे विराटसारखा फलंदाज हवा’, ‘किंग’ कोहलीविषयी रोहितची जबरदस्त प्रतिक्रिया
जडेजाचे विराटच्या खेळीबाबत मोठे विधान; म्हणाला, ‘कोहलीचे हे शतक…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---