वनडे मालिकेत विजय मिळवणाऱ्या बांगलादेश संघाला कसोटी मालिकेत पराभवाचा धक्का बसला. भारताने ढाका येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा 3 विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात विजय मिळवत भारताने ही मालिका 2-0ने विजय नावावर केली. भारताने बांगलादेशचा पराभव केल्यानंतर यजमान संघाचा कर्णधार शाकिब अल हसन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. चला तर शाकिब काय म्हणालाय जाणून घेऊयात…
‘एक विकेट घेतली असती तर…’
बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याचा विश्वास आहे की, जर त्याच्या संघाने एक विकेट घेतली असती, तर सामन्याचा निकाल वेगळा असता. मात्र, त्याने शानदार खेळीसाठी अश्विनला सर्व श्रेय दिले. तो म्हणाला की, “आमच्या संघाच्या प्रत्येक खेळाडूने योगदान दिले. आम्ही या मैदानावर चांगले प्रदर्शन केले आहे. श्रेयस आणि अश्विनने दबावात चांगली फलंदाजी केली. आम्हाला आणखी एका विकेटची गरज होती. आम्ही अनेक प्रकारचे विचार करू शकलो असतो, पण मला आनंद आहे की, आम्ही कडवी झुंज दिली.”
आपल्या गोलंदाजी कामगिरीबद्दल बोलताना शाकिब म्हणाला की, “दुर्दैवाने आम्ही पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी करू शकलो नाही. मात्र, मी चांगली गोलंदाजी केली. संघ ज्या मानसिकतेने खेळला, त्यावर मी खुश आहे. आशा आहे की, पुढील वर्षी आम्हाला चांगले निकाल मिळतील.”
अश्विनला मिळाले होते जीवनदान
आर अश्विन (R Ashwin) याला क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोमिनुल हक याने मेहदी हसन याच्या चेंडूवर जीवदान दिले होते. याचा फायदा घेत अश्विनने शानदार फलंदाजी केली आणि नाबाद 42 धावा चोपत संघाला विजयी केले. दुसऱ्या डावात अश्विन भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.
सामन्याच्या चौथ्या डावात भारतापुढे बांगलादेशने 145 धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघ 7 विकेट्स गमावत 74 धावांवर खेळत होता. अशात श्रेयस अय्यर आणि आर अश्विन याने आठव्या विकेटसाठी नाबाद 71 धावांची भागीदारी रचली आणि भारतीय संघाला शानदार विजय मिळवून दिला. (captain shakib al hasan on defeat against india read what he says)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुनील गावसकरांवर कोसळला दुःखाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास
हा कसला ऍटिट्यूड! कुलदीपला दुसऱ्या कसोटीतून डच्चू देणारा कर्णधार म्हणाला, ‘मला पश्चाताप होत नाहीये…’