fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

हॉकी ओडिशाने चौथ्यांदा जिंकली राष्ठ्रीय स्पर्धा

औरंगाबाद। हॉकी ओडिशा विरुद्ध उत्तर प्रदेश हॉकी यांच्यात विजयासाठी निर्धारित वेळेत संघर्षपुर्ण झालेल्या लढतीचा निकाल “बरोबरी’ असा राहिला. पण शुटआऊटमध्ये बाजी मारत हॉकी ओडिशाने चौथ्यांदा राष्ट्रीय ज्युनीयर हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. औरंगाबादेतील भारतीय खेळ प्राधिकरणच्या टर्फ मैदानावर तेरा दिवसांपासुन सुरु असलेल्या स्पर्धेचा गुरुवारी (28 फेब्रुवारी) समारोप झाला.

हॉकी ओडिशा आणि पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या उत्तरप्रदेश हॉकी संघात अंतिम सामना झाला. सामन्याच्या निर्धारीत वेळेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधली होती. मात्र शुटआऊटमध्ये झालेल्या संघर्षात हॉकी ओडिशाने 4-3 च्या फरकाने बाजी मारली आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. सुशांत टोपोच्या 30 व्या मिनीटांतील गोलने हॉकी ओडिशाला आघाडी दिली जी आनंद शिवमने कापुन काढली.

नंतर शुटआऊटमध्ये गेलेल्या या खेळात प्रकाश धीर, सुनील धंवर, लबान लूगुन आणि कर्णधार कृष्णा तिर्कीने गोल करत आघाडी कायम केली. गोपीकुमार सोनकर, अभिषेक कुमार सिंग आणि विष्णु सिंग यांनी उत्तरप्रदेशकडुन ओडिशाची आघाडी कापण्याचा प्रयत्न केला.

त्यापुर्वी हॉकी हरियाणाने तिसरे स्थान पटकावत मध्यप्रदेश हॉकी अकादमीचा 2-1 ने धूव्वा उडवला. मध्यप्रदेश हैदर अलीने पाचव्या मिनीटांत गोल करुन कमावलेली आघाडी हरियाणाच्या बॉबी सिंग धामी (29 मि.) परमित (39 मि.) यांनी गोल करत ही आघाडी कापुन काढली.

निकाल :
अंतिम सामना: हॉकी ओडिशा : 1,4 (सुशांत टोपो 30 मि., प्रकाश धीर, सुशील धंवर, लबन लूगुन, कृष्णा तिर्की) वि. वि. उत्तर प्रदेश हॉकी : 1,3 विष्णु सिंग, अभिषेक कुमार सिंग). हाफटाईम : 1-0
तृतीय स्थान : हॉकी हरियाणा : 2 (बॉबी सिंग धामी 29 मि., परमित 39 मि.) वि. वि. मध्यप्रदेश हॉकी अकादमी : 1 (हैदर अली 5 मि.) हाफटाईम : 0-1

You might also like