पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान सध्या भारतात आहे. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे यजमानपद भारतीय संघाकडे असल्यामुळे रिझवान आणि त्याच्या सहकऱ्यांना पहिल्यांदाच भारतात खेळण्याचा अनुभव घेता आळा. यष्टीरक्षक फलंदाज विश्वचषकादरम्यान चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. मात्र, अशातच त्याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वोच्चम न्यायलायचे वकील विनीत जिंदल यांनी आयसीसीकडे मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याच्या वोरिधात तक्रार केली आहे. पाकिस्तानचा हा यष्टीरक्षक फलंदाज अनुभवी असून त्याने आतापर्यंत अनेकदा आपल्या संघासाठी मॅच विनरची भूमिका पार पाडली आहे. त्याने वनडे विश्वचषक 2023 सुरू झाल्यापासून नेदर्लंड्सविरुद्ध 68, श्रीलंकेविरुद्ध 131*, तर भारताविरुद्ध 49 धावांची महत्वपूर्ण खेळी केली आहे. मात्र, फॉर्ममध्ये असणाऱ्या रिझवानला आपली एक जुनी सवय महागात पडू शकते.
रिझवान अनेकदा लाईव्ह सामन्यात मनाज पठण करताना दिसतो. विश्वचषकात पाकिस्तान आणि नेदर्लंड्स यांच्यातील सामन्यादरम्यानही त्याने मैदानात मनाज पठण केले. याच कारणास्तव वकील विनीत जिंदल यांनी आयसीसीकडे तक्रार केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विनीत जिंदल मागच्या काही दिवसांपासून सतत माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानची समालोचक झैनाब अब्बास हिच्याविरुद्ध देखील तक्रार दाखल केली होती.
माध्यमांतील वृत्तांनुसार झैनाबने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून केलेल्या जुन्या पोस्टमध्ये भारत आणि हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या होत्या. याच कारणास्तव विनीत जिंदलने तिच्याविरुद्धात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणानंतर झैनाबला सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि धणक्या मिळू लागल्या होत्या. परिणामी समालोचकाने विश्वचषक अर्ध्यात सोडून पाकिस्तानला परतण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वी मोहम्मद रिझवानने इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धाबाबतही प्रतिक्रिया दिली होती, ज्यामुळे एक नवा वाद देखील सुरु झाला होता. (Complaint filed with ICC against Mohammad Rizwan’s Namaz reading)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाचे जोरदार कमबॅक! शतकी सलामीनंतर श्रीलंकेचा अवघ्या 209 धावांत उडाला खुर्दा
कॅप्टन असावा तर असा! पाकिस्तानच्या डावाला रोहितच्या ‘त्या’ निर्णयामुळे लागला सुरूंग, कुलदीपने केला खुलासा