यावर्षीच्या पद्म पुरस्कारांची काल(25 जानेवारी) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये विविध खेळांतील 9 खेळाडूंनाही पद्म पुरस्कार जाहिर झाला आहे.
यातील माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, फुटबॉलपटू सुनील छेत्री, कुस्तीपटू बजरंग पुनीया यांच्यासह आठ खेळाडूंना पद्मश्री तर पर्वतारोहक बछेंद्री पाल यांना पद्मभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
गंभीरने काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत भारताच्या 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 च्या वनडे विश्वचषक विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
त्याचबरोबर छेत्री हा भारताचा सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू असून तो सध्या खेळत असलेल्या फुटबॉलपटूंमध्येही सर्वाधिक गोल करण्यामध्ये पहिल्या तीन खेळाडूंमध्ये आहे. तर बजरंग पुनीयाने 2018 च्या एशियन गेम्समध्ये आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.
या तिघांव्यतिरिक्त कबड्डीपटू अजय ठाकूरलाही पद्मश्री पुरस्कार मिळणार आहे. तो पद्म पुरस्कार मिळवणारा पहिलाच कबड्डीपटू आहे. तसेच बुद्धीबळपटू द्रोणावल्ली हरिका, टेबल टेनिसपटू शरत कमल, तिरंदाज बोम्बाल्या देवी लैशराम आणि बास्केटबॉलपटू प्रशांती सिंग यांनांही पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे.
यावर्षीसाठी भारत सरकारने एकूण 112 लोकांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे. ज्यामध्ये 4 पद्मविभूषण, 14 पद्मभूषण आणि 94 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
या खेळाडूंची झाली 2019 पद्म पुरस्कारांसाठी निवड –
बछेंद्री पाल – पर्वतारोहण(पद्मभूषण)
पद्मश्री –
गौतम गंभीर – क्रिकेट
द्रोणावल्ली हरिका – बुद्धीबळ
शरत कमल – टेबल टेनिस
बोम्बाल्या देवी लैशराम – तिरंदाज
प्रशांती सिंग – बास्केटबॉल
अजय ठाकूर – कबड्डी
बजरंग पुनीया – कुस्ती
महत्त्वाच्या बातम्या-
–केवळ ३७ सामने खेळणाऱ्या कुलदीप यादवचा झाला तेंडुलकर-कुंबळे या दिग्गजांच्या यादीत समावेश
–एमएस धोनीकडून ब्रायन लारा, कॅलिस या दिग्गजांचा विक्रम मोडीत
–प्रजासत्ताक दिनी अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचा अनोखा पराक्रम