यंदाच्या आयसीसी टी20 विश्वषकात (ICC T20 World Cup) भारतानं चमकदार कामगिरी केली आहे. साखळीफेरीच्या पहिल्या 3 सामन्यात अमेरिका, पाकिस्तान, आयर्लंड या संघांना भारतानं धूळ चारली. तर साखळीफेरीचा शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध फ्लोरिडामध्ये खेळला जाणार होता. परंतु पावसानं खोळंबा घातला असल्या कारणानं हा सामना रद्द झाला. तत्पूवी विराट कोहलीसोबत (Virat Kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवींद्र जडेजा यांचा हा शेवटचा टी20 विश्वचषक असू शकतो.
भारतासाठी अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय टी20 साठी तयार होत आहेत. परंतु संघात अनेक सीनियर खेळाडू असल्यानं युवा खेळाडूंना संधी मिळत नाही. त्यामुळे भविष्यात भारतीय संघ काही बदल करु शकतो. याआधी विराट आणि रोहित आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटपासून बराच वेळ लांब राहिले आहेत. परंतु यंदाच्या टी20 विश्वचषकात दोघांना संधी मिळाली. या टी20 विश्वचषकात विराट कोहली पहिल्या 3 सामन्यात पूर्ण फ्लाॅप गेला. तर रवींद्र जडेजाला अजून फलंदाजीला संधी मिळाली नाही.
कोहलीनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला तर रिषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या जागी खेळू शकतो. पंतनं यंदाच्या टी20 विश्वचषकात आक्रमक फलंदाजी केली आहे. भारतीय संघाला सलामीसाठी यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल यांच्यासारखे प्रतिभावान युवा खेळाडू आहेत. संजू सॅमसन सुद्धा मधल्या फळीत भारतीय संघासाठी चांगली फलंदाजी करु शकतो. त्याचं वय सध्या 29 आहे.
रोहित, जडेजा आणि कोहली यांच्यासाठी हा शेवटचा टी20 विश्वचषक असू शकतो. यानंतर भविष्यात त्यांना आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट खेळण्याची कमी संधी मिळू शकते. पुढचा टी20 विश्वचषक 2026ला भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळला जाणार आहे. कोहलीचं वय 35 वर्षे आहे. परंतु तो खूप फिट आहे. भविष्यात तो कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करु शकतो. रोहित 37 वर्षाचा झाला आहे. त्याच्यासाठी फिटनेस खूप महत्त्वाची भूमिका आहे. तर जडेजाचं वय देखील 35 वर्षे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सुपर-8 सामन्यांपूर्वी विराट कोहलीचा कूल अंदाज, रिंकू-जयसवालही संघात दाखल, व्हिडिओ व्हायरल
नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला तर कोण जिंकेल? वसीम अक्रमची प्रतिक्रिया व्हायर
स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात घेतला धक्कादायक झेल! मैदानावरील कोणाचाच विश्वास बसेना; VIDEO एकदा पाहाच