आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात व्हायला फारसा वेळ राहिलेला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार असून भारतीय संघ 20 फेब्रुवारीपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. टीम इंडिया दुबईमध्ये हायब्रीड मॉडेल अंतर्गत आपले सामने खेळणार आहे.
भारताने शेवटचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये जिंकले होते. यानंतर 2017 मध्येही संघ फायनलमध्ये पोहोचला होता. पण त्यानंतर त्यांना पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, यावेळी टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची प्रबळ दावेदार आहे. यावेळी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद का जिंकू शकतो याची तीन कारणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
3. वनडे साठी सर्वोत्तम संघ
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी वनडेसाठी भारताकडे जबरदस्त संघ आहे. 2023च्या विश्वचषकात भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता आणि यावेळीही संघ हाच पराक्रम करू शकतो. भारताकडे एकदिवसीय सामन्यासाठी परिपूर्ण संयोजन आहे आणि यामुळे टीम इंडिया इतर संघांसाठी एक मोठे आव्हान ठरू शकते.
2.उत्कृष्ट बॉलिंग लाइन अप
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडल्या जाणाऱ्या भारतीय संघात अनेक उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांचा समावेश केला जाऊ शकतो. जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी सर्वात मोठा अस्त्र असेल. त्याच्याशिवाय मोहम्मद शमीही चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत पुनरागमन करू शकतो. यासाठी त्यांची पूर्ण तयारी सुरू आहे. शमी आल्यावर भारताची गोलंदाजी अधिक मजबूत होईल. याशिवाय भारताकडे मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंगसारखे वेगवान गोलंदाज आहेत. फिरकीमध्ये कुलदीप यादव आणि अक्षर पटेल महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
1. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा अनुभव
रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भलेही चांगलेच फ्लॉप झाले असतील पण हे खेळाडू एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमत्कार करू शकतात. दोघांना एकदिवसीय सामन्याचा खूप अनुभव आहे. ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर या दोन्ही खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करायचे आहे. अशा परिस्थितीत दोघेही मजबूत कामगिरी करू शकतात.
हेही वाचा-
‘हो.. माझी चूक होती…’, बुमराहसोबत झालेल्या वादाबाबत सॅम कॉन्स्टासचा मोठा खुलासा
संजू सॅमसन शर्यतीतून बाहेर! चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रिषभ पंतसोबत कोणाला संधी मिळणार?
रोहित शर्माचे कसोटी क्रिकेटमधील भविष्य मुख्य निवडकर्त्याच्या हातात, बीसीसीआय घेणार मोठा निर्णय?