भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (27 नोव्हेंबर) खेळला गेला.या सामन्यात हार्दिक पंड्या गोलंदाजीसाठी तंदुरुस्त नसतानाही मनीष पांडेऐवजी त्याला तज्ञ् फलंदाज म्हणून प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं. तसेच अष्टपैलू रवींद्र जडेजाचाही प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. या निर्णयाबद्दल माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांनी रोखठोक मत व्यक्त केले आहे.
जडेजासारखे खेळाडू वनडेसाठी योग्य नाही-मांजरेकर
संजय मांजरेकर यांनी आयसीसी विश्वचषक 2019 दरम्यान रवींद्र जडेजाच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले होते की जडेजा वनडे संघात छोटे योगदान देतो. म्हणजे तो एक चांगला फलंदाज किंवा चांगला गोलंदाज नाही. पण त्यानंतर जडेजाने चांगली कामगिरी करून मांजरेकरांना प्रत्युत्तर दिले होते.
आता मांजरेकर यांनी पुन्हा एकदा जडेजाच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने जडेजाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावर बोलताना मांजरेकर म्हणाले की, “रवींद्र जडेजाशी मला कोणतीही समस्या नाही पण वनडे क्रिकेटसाठी जडेजासारखे खेळाडू योग्य नाहीत.”
हार्दिकला फलंदाज म्हणून संघात मिळू नये स्थान
संजय मांजरेकर यांनी केवळ जडेजाच नाही, तर भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हार्दिक पंड्याच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याबद्दल बोलताना मांजरेकर म्हणाले की, “अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात पंड्या योग्य आहे. पण गोलंदाजीसाठी तो तंदुरुस्त नसला तर त्याला तज्ज्ञ फलंदाज म्हणून संघात स्थान मिळू नये, पंड्याऐवजी मनीष पांडेला संघात स्थान द्यावे.”
मनीष पांडे 4 थ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज-सेहवाग
मात्र, सिडनी येथे झालेल्या पहिल्या वनडेत पंड्याने 90 धावा करून मांजरेकरांचा मुद्दा चुकीचा सिद्ध केला. वीरेंद्र सेहवागने पंड्याचे समर्थन करताना म्हटले की, “मनीष पांडे हा 4 थ्या क्रमांकासाठी योग्य खेळाडू आहे पण 6 व्या क्रमांकावर पंड्यासारख्या खेळाडूची आवश्यकता आहे, जो पॉवर हीटिंगबरोबर एकेरी-दुहेरी धावाही करू शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
निशामच्या खिल्लीवर मॅक्सवेलचे उत्तर, ‘मी केएल राहुलची माफी मागितली’
‘या’ दोघांना मिळणार भारतीय संघातून डच्चू? मुंबईकर खेळाडूची लागणार वर्णी
विराट इतका बिझी कोणीच नाही! दहा वर्षात खेळला ‘इतके’ दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट