आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 साठी शुक्रवारी (दि. 14 जुलै) भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या वर्षीच्या अखेरीस विश्वचषक असल्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले नाहीये. मात्र, आयपीएल 2023 स्पर्धा गाजवणाऱ्या अनेक खेळाडूंची या संघात निवड झाली आहे. त्यात रिंकू सिंग याचाही समावेश आहे. अशात निवड झाल्याबद्दल रिंकूने एका शब्दात मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल 2023 गाजवलं
रिंकू सिंग (Rinku Singh) याने वादळी फलंदाजीने आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात वाहवा लुटली होती. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून खेळणाऱ्या रिंकूने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातील अखेरच्या षटकात 5 चेंडूंवर सलग 5 षटकार खेचत सामना जिंकला होता. यानंतर तो जागतिक क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. रिंकूने याव्यतिरिक्त अनेक वादळी खेळी साकारल्या होत्या. त्याने या हंगामात 14 सामन्यात 59.25च्या सरासरीने 474 धावा केल्या होत्या. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश होता.
रिंकूला मागील काही काळापासून भारतीय संघात सामील करण्याची मागणी केली जात होती. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जेव्हा संघ निवड झाली आणि टी20 संघात त्याला घेतले नाही, तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. यानंतर असे वृत्त आले होते की, त्याला आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवडले जाईल. मात्र, आता रिंकूला आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 (Asian Games 2023) साठी भारतीय संघात संधी मिळाली आहे.
रिंकू सिंंगची प्रतिक्रिया
अशात रिंकूने भारतीय संघात निवड झाल्याबद्दल सोशल मीडियावर खास प्रतिक्रिया दिली. केकेआर संघाने इंस्टाग्राम दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत रिंकू केकेआरच्या जर्सीत दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत तो भारतीय संघाच्या जर्सीत दिसत आहे. यावर “फायनली” म्हणजेच अखेर संधी मिळालीच असे लिहिले आहे. हीच पोस्ट रिंकूने त्याच्या इंस्टा स्टोरीवर ठेवली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023साठी भारतीय संघ-
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग. (cricketer rinku singh reacts after earning maiden india call up know here)
महत्वाच्या बातम्या-
आशियाई स्पर्धांसाठी पंजाब किंग्सच्या 3 धुरंधरांना टीम इंडियात संधी, एकाने आधीच केलंय पदार्पण
दिवस बदलले! टीम इंडियाचा स्टार जयसवालने ठाण्यात घेतलं नवीन घर, आधी राहायचा भाड्याच्या घरात