जगप्रसिद्ध महान फुटबॉलपटूंपैकी एक क्रिस्तियानो रोनाल्डो. फिफा विश्वचषक सुरू होण्यास काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना त्याने मॅनचेस्टर युनायटेड क्लबवर धोका देण्याचा आरोप लावला आहे. रोनाल्डोने एका मुलाखतीमध्ये मॅनचेस्टर युनायटेड आणि क्लबचे मॅनेजर एरिक टेन हॅग यांच्यावर आरोप लावले आहेत. त्यामध्ये त्याने क्लबमधील काही वरिष्ठ त्याला क्लबमध्ये पाहू इच्छित नाही, असे म्हटले आहे.
या हंगामामध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याला क्लबकडून खूपच कमी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. काही सामन्यांमध्ये तर त्याला सुरूवातीच्या अकरा खेळाडूंमध्येही घेतले नव्हते. तसेच त्याला रविवारी (13 नोव्हेंबर) फुलहॅमविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही संघात घेतले नव्हते. हा सामना युनायटेडने 2-1ने जिंकला. त्याने प्रसिद्ध पत्रकार पियर्स मॉर्गन यांना मुलाखत दिली. यामध्ये रोनाल्डोने अनेक खुलासे केले. त्यामध्ये त्याने युनायटेडचे मॅनेजर एरिक टेन हॅग (Erik ten Hag) यांच्यावर निशाना साधला.
रोनाल्डोने मॅनेजरबाबत बोलताना म्हटले, “माझ्या मनात त्यांच्याविषयी सन्मान नाही कारण ते मला सन्मान देत नाही. जेव्हा तुम्ही माझ्यासाठी सन्मान देत नाही तेव्हा मी का देऊ.”
युनायटेडसोबत रोनाल्डो 12 वर्षानंतर जोडला गेला. त्याने 2009मध्ये क्लब सोडला होता, तर 2021मध्ये पुन्हा क्लबमध्ये शामिल झाला. 2009मध्ये जेव्हा त्याने क्लब सोडला तेव्हा तो स्पेनच्या रियल माद्रिदशी जोडला गेला. त्यानंतर त्याने इटलीच्या युवेंट्सकडूनही काही सामने खेळले.
रोनाल्डो 2022-23च्या हंगामात युनायटेड क्लब सोडणार होता, मात्र त्याला नवीन क्लब मिळाला नाही. त्याबाबत बोलताना त्याने पुढे म्हटले, ” मॅनचेस्टर युनायटेडमध्ये मला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये दोन ते तीन वरिष्ठांचा समावेश आहे. इथे मला विश्वासघात केल्याची जाणीव होत आहे. खूप जणांना वाटत असेल मी इथे नसावे मात्र चाहत्यांनाही काळयला पाहिजे नेमके काय झाले ते. हे काही पहिल्यांदाच होत नसून मागील हंगामातही असेच झाले होते.”
युनायटेडशी जोडण्याआधी तो मॅनचेस्टर सिटीमध्ये जाणार होता. सिटी आणि युनायटेड हे मागील कित्येक वर्षापासून प्रतिस्पर्धी आहे आणि कोणत्याच युनायटेडच्या खेळाडूने सिटीकडून खेळावे अशी चाहत्यांची इच्छा नाही. त्यामुळेच रोनाल्डो युनायटेडमध्ये परतला.Cristiano Ronaldo blasts at manchester united boss Erik ten Hag
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: कॅप्टन असावा तर जोस बटलरसारखा! सेलिब्रेशनपूर्वी रशिद, मोईनला केले सतर्क; कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित
VIDEO: सामना ऑस्ट्रेलियात, राडा पंजाबमध्ये! इंग्लंड-पाकिस्तान सामन्यावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये दगडफेक