रविवार (दि. 28 मे) हा दिवस असंख्य क्रिकेटप्रेमींसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी आमने-सामने येणार आहेत. विशेष म्हणजे, हंगामातील पहिला सामना या दोन संघातच झाला होता. अशात आता सीएसके संघ शनिवारी (दि. 27 मे) चेन्नईहून अहमदाबादसाठी रवाना झाला. यादरम्यान विमान प्रवासात दीपक चाहर पत्नी जया भारद्वाज हिच्यासोबत एमएस धोनी याचा व्हिडिओ काढताना दिसला.
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यातही गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघ आमने-सामनेन होते. या सामन्यात सीएसकेने गुजरातला 15 धावांनी पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले होते. तसेच, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला 62 धावांनी पराभूत करत सलग दुसऱ्या हंगामात अंतिम सामन्यात एन्ट्री केली.
दीपक चाहरने बनवला व्हिडिओ
चेन्नई ते अहमदाबाद विमान प्रवासादरम्यान सर्व चेन्नईचे खेळाडू उपस्थित होते, तेव्हाच दीपच चाहर पत्नी जया भारद्वाज (Deepak Chahar Wife Jaya Bhardwaj) हिला मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत असतो. याचवेळी एमएस धोनी (MS Dhoni) तिथून जाऊ लागतो. धोनीला पाहताच दीपक चाहर (Deepak Chahar) फोनचा कॅमेरा चालू करून ‘माही’चा व्हिडिओ शूट करू लागतो. चाहरला असे करताना पाहून धोनीही हसतो.
View this post on Instagram
हा व्हिडिओ चेन्नईने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 29 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 6 लाखांहून अधिक लाईक्स आणि 1 हजारांपेक्षा जास्त कमेंट्सचाही वर्षाव झाला आहे.
चेन्नई 10व्यांदा खेळणार आयपीएलचा अंतिम सामना
विशेष म्हणजे, आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याची चेन्नईची ही दहावी वेळ आहे. यापूर्वी खेळल्या गेलेल्या 9 अंतिम सामन्यांपैकी चेन्नईने चार सामन्यात विजय मिळवला. तसेच, पाच वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईला अंतिम सामन्यात सर्वाधिक 3 वेळा मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तसेच, गुजरात टायटन्स संघ यावेळी त्यांचा सलग दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहेत. आयपीएल 2022च्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्स संघाला सहजरीत्या 7 विकेट्सने पराभूत करत ट्रॉफी जिंकली होती. (csk bowler deepak chahar makes video of ms dhoni while sitting with his wife in the flight see mahi reaction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापरे बाप! अंतिम सामन्यात धोनी रचणार रेकॉर्ड, IPL इतिहासात भल्याभल्यांना जमली नाही ‘ही’ कामगिरी
‘तू काय उखडलंस…’, नवीन उल हकला ट्रोल करणे मुंबईच्या ‘या’ फलंदाजाच्या अंगलट; युजर्सनी साधला निशाणा