fbpx
Wednesday, January 27, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदा ‘हा’ संघ जिंकणार आयपीएलचे विजेतेपद; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने केली भविष्यवाणी

September 19, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL


नवी दिल्ली| आयपीएलच्या 13 व्या हंगामाची आजपासून सुरुवात होईल. आज रात्री 7.30 वाजता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. प्रत्येकाला त्याच्या आवडत्या संघाला चॅम्पियन होतांना पाहायचं आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने एका संघांचे नाव सांगितले आहे. जो या हंगामात आयपीएलचा खिताब मिळवू शकतो. तो स्टार स्पोर्ट्सच्या गेम प्लॅन या कार्यक्रमात बोलत होता.

तो म्हणाला, “तीन वेळा आयपीएलचा खिताब जिंकणारा चेन्नई संघ या हंगामातही विजेतेपदाचा दावेदार आहे. सीएसके संघातील फिरकी विभागातील विविधतेमुळे युएईच्या परिस्थितीत संघाला फायदा होईल. सीएसके खूप मजबूत संघ आहे. संघात असलेल्या फिरकीपटूंमुळे मी या संघाची चॅम्पियन होण्याची भविष्यवाणी केली आहे. संघात फिरकीपटू मिशेल सॅन्टनर आहे त्यामुळे फिरकीपटू जडेजाला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल जेणेकरून तो संघाचा अव्वल फिरकीपटू राहील. संघात प्रत्येक फिरकी गोलंदाज इतर फिरकी गोलंदाजापेक्षा वेगळा आहे. अशा परिस्थितीत, मला असे वाटते की स्पर्धा जसजशी समोर जाईल याचा फायदा चेन्नई संघाला होईल.”

चार वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणास्तव या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

मलिंगाच्या अनुपस्थितीबद्दल बोलतांना ब्रेट ली म्हणाला, “वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मलिंगाची कमतरता पूर्ण करेल. जेव्हापासून मी बुमराहला पाहिले तेव्हापासून मी त्याचा चाहता आहे. तो वेगळ्या शैलीने गोलंदाजी करतो. तो दोन्ही बाजुला चेंडू फिरविण्यात पटाईत आहे. नवीन चेंडूने तो चांगली कामगिरी करतो. जुन्या चेंडूने गोलंदाजी करतांना मला तो अधिक आवडतो. मलिंगा प्रमाणेच तो शेवटच्या षटकात गोलंदाजी करू शकतो.”

मुंबई इंडियन्सबद्दल बोलतांना तो म्हणाला, “मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या चार संघांमध्ये राहील. ते मागील हंगामाचे चॅम्पियन आहेत. त्यांचा संघ चांगला आहे. टी20 चा स्टार फलंदाज कायरान पोलार्ड चांगला खेळत आहे आणि रोहित काय करू शकतो हे आपल्याला माहितच आहे. संघात वेगवान गोलंदाज बुमराह आणि काही अनुभवी फिरकीपटूदेखील आहेत.”

महत्त्वाच्या बातम्या – 

सीएसकेसाठी आनंदाची बातमी! पहिल्या सामन्याआधी क्वारंटाईनमधून बाहेर आले हे ३ दिग्गज खेळाडू

आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माला आली लसिथ मलिंगाची आठवण म्हणाला…

या कारणामुळे चाहते धोनीवर चिडले; सोशल मीडियावर घेतला समाचार

ट्रेंडिंग लेख –

‘या’ ६ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल आजच्या आयपीएल सामन्याचा निकाल

‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार

हे ३ खेळाडू, जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा बनवू शकतात पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन


Previous Post

सीएसकेसाठी आनंदाची बातमी! पहिल्या सामन्याआधी क्वारंटाईनमधून बाहेर आले हे ३ दिग्गज खेळाडू

Next Post

काय सांगता! वयाच्या २५व्या वर्षीच वैतागून ‘त्याने’ केला क्रिकेटला टाटा बाय बाय

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ऑस्ट्रेलियात ‘या’ गोष्टीचा फलंदाजी करताना झाला कायदा, वॉशिंग्टन सुंदरची प्रतिक्रिया

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter
क्रिकेट

“भारताविरुद्ध सलामी करणार का?,” डीकवेल्लाचा डॉम सिब्लीला प्रश्न, पाहा मजेशीर व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI & ICC
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

गावसकर यांनी केला खुलासा, भारताच्या मालिका विजयानंतर ब्रायन लारा मला मिठी मारत म्हणाले…

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

रिषभ पंत प्रत्येक मालिकेनंतर किट बॅग देतो ज्यूनियर क्रिकेटरला, त्यामागे ‘हे’ आहे खास कारण

January 27, 2021
Photo Curtsey: Facebook/Indian Cricket Team
क्रिकेट

भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना चेन्नईला पोहचल्यानंतर ‘इतक्या’ दिवस रहावे लागणार क्वारंटाईन

January 27, 2021
क्रिकेट

अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर

January 27, 2021
Next Post

काय सांगता! वयाच्या २५व्या वर्षीच वैतागून 'त्याने' केला क्रिकेटला टाटा बाय बाय

Photo Courtesy: Twitter/BCCIdomestic

अखेर ऋतुराज गायकवाड पहिला सामना खेळणार की नाही याचे उत्तर मिळाले

Photo Courtesy: Twitter/Mipaltan

अतिशय महत्त्वाच्या 'या' व्यक्तींनाही स्टेडियमवर पाहता येणार नाही आयपीएलचा सामना

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.