विश्वचषक 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेतील 39 सामने पार पडले आहेत. आता स्पर्धेचा 40वा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे रंगणार आहे. या सामन्यात गतविजेता इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने जिंकली असून त्याने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात इंग्लंड संघात दोन बदल झाले आहेत. मार्क वूड आणि लियाम लिव्हिंगस्टोन बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी हॅरी ब्रूक आणि गस एटकिन्सन यांची एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे, नेदरलँड्स संघात एक बदल असून साकिब झुल्फिखार याच्या जागी तेजा निदामानुरू याला संधी मिळाली आहे.
स्पर्धेतील कामगिरी
विश्वचषक 2023 स्पर्धेतील उभय संघांच्या कामगिरीचा विचार केला, तर इंग्लंड संघाने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना फक्त 1 विजय मिळवता आला आहे, तर उर्वरित 6 सामन्यांवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे. फक्त एक विजयामुळे इंग्लंड 2 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानी आहे.
दुसरीकडे, नेदरलँड्स संघाबद्दल बोलायचं झालं, तर गतविजेत्या इंग्लंडपेक्षा नेदरलँड्स संघ या विश्वचषकात चांगले प्रदर्शन करण्यात यशस्वी झाला आहे. त्यांनी 7 सामने खेळून 2 विजय, तर 5 सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यांचे 4 गुण असून पॉईंट्स टेबलमध्ये त्यांचा नववा क्रमांक आहे. विशेष म्हणजे, या 2 विजयांमध्ये एक मोठा उलटफेरही आहे. त्यांनी स्पर्धेच्या 15व्या सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाला 38 धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. (cwc 2023 England have won the toss and have opted to bat against netherlands)
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 40व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड
जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेविड विली, गस टकिन्सन, आदिल रशीद
नेदरलँड्स
वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, सीब्रँड एंजेलब्रेच, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीडे, तेजा निदामानुरु, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
हेही वाचा-
मॅक्सवेलची महानता सिद्ध करणारा जबरदस्त रेकॉर्ड, 11 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम
एकच फाईट वातावरण टाईट! मॅड मॅक्सने 201 धावा करताच बनले 5 World Record, मोडणे खूपच कठीण