विश्वचषक 2023 स्पर्धेत शनिवारचा (दि. 28 ऑक्टोबर) दुसरा डबल हेडर सामना नेदरलँड्स विरुद्ध बांगलादेश संघात खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता येथील इडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक नेदरलँड्स संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
नेदरलँड्स संघात दोन बदल करण्यात आले आहेत. रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह याच्या जागी शरीज अहमद संघात आला आहे. तसेच, वेस्ली बॅरेसीही संघात आला आहे. याव्यतिरिक्त बांगलादेश संघातही दोन बदल आहेत. तस्कीन अहमद नसुम अहमदच्या जागी संघात आला आहे. तसेच, महेदी हसन हा हसन महमूदच्या जागी संघात सामील झाला आहे.
कशीये उभय संघांची स्पर्धेतील कामगिरी?
नेदरलँड्स आणि बांगलादेश (NED vs BAN) संघ विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत एकाच नावेत आहेत. नेदरलँड्सने 5 सामने खेळले असून त्यात त्यांनी 1 विजय मिळवला आहे, तर उर्वरित 4 सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. यासह ते 2 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानी आहेत.
दुसरीकडे, बांगलादेश संघानेही 5 सामने खेळले असून त्यात त्यांना 4 पराभवांचा सामना करावा लागला आहे. तसेच, फक्त 1 सामन्यात विजय मिळाला आहे. बांगलादेश 2 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. अशात दोन्ही संघ या सामन्यात आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. (cwc23 Netherlands won the toss and opted to bat first against Bangladesh)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
नेदरलँड्स
विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, वेस्ली बॅरेसी, कॉलिन एकरमन, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीडे, सीब्रँड एंजेलब्रेच, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
बांगलादेश
तंजीद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, मेहिदी हसन मिराज, महेदी हसन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम
हेही वाचा-
CWC 23 Points Table: पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांना झटका, दक्षिण आफ्रिकेने भारताला पछाडले
‘आमच्यासाठी दरवाजे…’, सलग चौथ्या निराशाजनक पराभवानंतर Babar Azam भावूक, सहकाऱ्यांबद्दल केलं मोठं विधान