fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची युवी-भज्जीकडे मदतीची याचना

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग व फिरकीपटू हरभजन सिंग यांच्याकडे पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने मदतीची याचना केली आहे. जगात सध्या १० लाख नागरिक हे कोरोनामुळे बाधीत झाले आहेत. यात पाकिस्तानमधील नागरिकांची संख्याही मोठी आहे.

याच पार्श्वभूमीवर युवराज सिंग व हरभजन सिंग यांनी काही दिवसांपुर्वी शाहिद आफ्रिदीच्या संस्थेला मदत केली होती. यावरुन त्यांच्यावर भारतात जोरदार टीकाही झाली होती. Pakistani minorities need your help too: Danish Kaneria appeals to Yuvraj and Harbhajan.

परंतु आता दानिश कनेरियाने युवराज व हरभजन सिंगला एक व्हिडीओ तयार करायला सांगितला आहे. ” मी हरभजन व युवराजला विनंती करतो की त्यांनी पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांसाठी एक व्हिडीओ तयार करावा. त्यांना कोरोनामुळे झालेल्या या परिस्थितीत तुमची गरज आहे. लोकं या लिंकवर पैसे देऊ शकतात, ” असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कनेरियाने पाकिस्तानकडून ६१ कसोटी व १९ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने अनुक्रमे २६१ व १५ विकेट्स घेतल्या आहेत. २००० ते २०१० या काळात तो पाकिस्तानकडून क्रिकेट खेळला आहे.

गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

You might also like