काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला आपल्या घरच्या मैदानावर इंग्लंडकडून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये अनेक घडामोडी घडल्या. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांसह निवडसमितीलाही त्यांच्या पदावरून पदमुक्त करण्यात आले. निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष म्हणून माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी याची नियुक्ती केली गेली आहे. मात्र, त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने निवडसमिती व संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली आहे.
सध्या न्यूझीलंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अखेरच्या क्षणी अनिर्णित राहिला. या सामन्यात पाकिस्तान संघाची कामगिरी तितकी चांगली राहिली नव्हती. तसेच, दुसऱ्या सामन्यातही न्यूझीलंडने पहिल्य डावात मोठी धावसंख्या उभारली आहे. याच कारणाने संतप्त झालेल्या दानिश कनेरियाने आपल्या युट्युब चॅनलवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,
“पाकिस्तानची निवड समिती आणि संघ व्यवस्थापन यांच्याकडे ती पात्रताच नाही. केवळ मैत्रीच्या आधारावर संघात निवड होताना दिसते. अशाने पाकिस्तान क्रिकेटचे आणखी खराब दिवस येतील. कर्णधार बाबरची यामध्ये कोणतीही चूक नाही. अगदीच पात्रता नसलेले लोक मोठ्यामोठ्या पदांवर येऊन बसलेत. संघ व्यवस्थापन आणि निवड समिती थर्ड क्लास आहे.”
इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर रमीझ राजा यांना अध्यक्षपदावरून दूर केले गेले. त्यांच्या जागी नजम सेठी अध्यक्ष बनले आहेत. तर, मोहम्मद वसीम यांना हटवून शाहिद आफ्रिदीकडे निवड समितीची धुरा दिली गेलेली आहे. त्यामुळे आफ्रिदी आगामी काळात कसे निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले दिसते.
(Danish Kaneria Slams PCB Team Management)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हाच कॉन्फिडन्स हवा! मालिकेआधीच हार्दिक म्हणतोय, “स्लेजिंगची काय गरज? आम्हाला बघूनच त्यांची…”
बाबर-रिझवानची पाकिस्तान संघातून होणार हकालपट्टी? आफ्रिदीने सुरू केली तयारी