फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) कतारमधील लुसेल स्टेडियम येथे खेळला गेला. अर्जेंटिना आणि फ्रान्स संघांमध्ये झालेल्या या सामन्यात चांगलाच थरार बघायला मिळाला. अर्जेंटिनाना हा सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 ने जिंकत विश्वविजेते होण्याचा मान मिळवला. हा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनेदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिला विश्वचषकाची ट्रॉफी मैदानापर्यंत आणण्याचा मान मिळाला होता. मात्र, फुटबॉलशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या दीपिकाला ही संधी कशी मिळाली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अंतिम सामन्यापूर्वी स्पेनचा माजी कर्णधार व विश्वविजेता गोलरक्षक इकर कॅसिलास आणि दीपिका पदुकोण यांनी विश्वचषकाची ही मानाची ट्रॉफी मैदानात आणत तिचे अनावरण केले. कॅसिलास हा फुटबॉलविश्वातील दिग्गज मानला जातो. मात्र, दीपिका व फुटबॉलचा कोणताही संबंध नाही. अशा परिस्थितीत तिला ही संधी कशी मिळाली हा किस्साही रंजक आहे.
विश्वचषकाचे ट्रॉफी ज्या केसमध्ये (ट्रॉफी ठेवण्याची जागा) ठेवली गेलेली ती केस आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई वितॉनने डिझाईन केलेली. दीपिका लुई वितॉनची ग्लोबल ब्रँड अँबेसिडर आहे. त्यामुळे लुई वितॉनची प्रतिनिधी म्हणून दीपिकाला ही संधी मिळाली. विश्वचषकाच्या या ट्रॉफीला हात लावण्याचा मान केवळ काही निवडक व्यक्तींनाच देण्यात येतो.
दीपिका पदुकोण सध्या अनेक कारणाने चर्चेत आहे. तिचा नवीन सिनेमा पठाण लवकरच रिलीज होतोय. या सिनेमातील बेशरम रंग या गाण्यावर काही संघटनांनी आक्षेप घेतला असून, या सिनेमाला बॉयकॉट करण्याची देखील मोहीम सुरू आहे.
(Deepika Padukone Unveil FIFA World Cup Trophy In Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अझर अलीच्या शानदार कारकिर्दीची दुर्दैवी अखेर; शेवटच्या डावात फुटला नाही भोपळा
लेकाने विश्वचषक जिंकताच थेट मैदानात धावली आई, आनंदाच्या भरात मेस्सीला मारली मिठी