भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने आगामी विश्वचषक 2023 मध्ये समालोचन करण्याचे संकेत दिले आहेत. वनडे विश्वचषक या वर्षी 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवला जाणार आहे.
कार्तिक याने ट्विटरवर एका यूजरच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. एका चाहत्याने दिनेश कार्तिकला ट्विटरवर टॅग केले आणि प्रश्न विचारला की, विश्वचषक 2023 साठी केएल राहुल, संजू सॅमसन आणि इशान किशन यापैकी कोणता यष्टीरक्षक फलंदाज तुमचा पहिला आणि दुसरा पर्याय आहे? कार्तिकने या प्रश्नाचे उत्तर देताना लिहिले,
‘तुम्ही मला नक्कीच विश्वचषकात बघाल”
दिनेश कार्तिकने दोनदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये समालोचन केले आहे. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा तो वनडे विश्वचषकात समालोचन करताना दिसणार आहे. सध्या कार्तिक द हंड्रेड स्पर्धेत इंग्लिश कॉमेंट्री पॅनल संघाचा भाग आहे. त्याने अलीकडेच इंग्लंडमध्ये ऍशेस 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 अंतिम सामन्यात समालोचन केलेले.
यष्टिरक्षणाचा विचार केला तर इशान किशन आणि केएल राहुल हे दोघेही वनडे विश्वचषकात भारतीय संघाची पहिली पसंती आहेत. इशान किशनने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावत जबरदस्त कामगिरी केली. दुसरीकडे अनुभवी फलंदाज केएल राहुलने मांडीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याचे पुनर्वसन पूर्ण केले असून, आगामी आशिया चषक 2023 साठी टीम इंडियाच्या संघात त्याची निवड होण्याची शक्यता आहे, जो 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंका येथे खेळला जाईल. या व्यतिरिक्त संजू सॅमसन याच्याकडे देखील पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
(Dinesh Karthik Confirmed He Will Do Commentry In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या-
नादच खुळा! शुबमन गिलची वनडे रँकिंगमध्ये गरुडझेप, टॉप 5 फलंदाजांमध्ये एकटाच भारतीय
कुलदीपचा भीमपराक्रम! 3 विकेट्स घेताच मोडून टाकला चहलचा ‘हा’ मोठा Record, लगेच वाचा