fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

द्रविडने श्रेय्यस अय्यर समज दिला, तु नक्की करतोय तरी काय?

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने आपल्या सुरुवातीच्या दिवसांमधील आठवण सांगितली आहे. यावेळी तो म्हणाला की, चार दिवसांच्या सामन्यादरम्यान शेवटच्या षटकात जोखिम घेत षटकार मारला होता. त्यावेळी भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज व प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्याला खडसावले होते.

कारकीर्दीच्या सुरुवातीला बेभान होऊन फलंदाजी करणाऱ्या अय्यरची (Shreyas Iyer) तुलना भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागशी (Virender Sehwag) केली गेली. पंरतु त्याची जरी बाकी प्रशंसा करत असले तरी राहुल द्रविडने त्याला चांगलेच खडसावले होते.

क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत अय्यर म्हणाला की, “हा  चार दिवसांचा सामना होता आणि द्रविड (Rahul Dravid) मला पहिल्यांदा खेळताना पाहत होता. हा पहिल्या दिवसातील शेवटचे षटक होते. मी जवळपास ३० धावांवर फलंदाजी करत होतो. सर्वांना वाटत होते की, मी सावकाश खेळेल.”

“परंतु गोलंदाजाने मला उसळी चेंडू टाकला आणि मी पुढे होऊन (स्टेप आऊट) हवेत जोरदार फटकार मारला. त्यामुळे हा षटकार गेला. त्यावेळी माझ्या संघातील प्रत्येक जण ड्रेसिंग रूममधून बाहेर डोकावत होते, की पहिल्या दिवसाच्या शेवटच्या षटकात असे कोण खेळते,” असेही अय्यर यावेळी म्हणाला.

अय्यर पुढे म्हणाला की, “त्या दिवशी द्रविडने यावरून माझे निरीक्षण केले होते. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, हे काय होते, बॉस? (What was this, boss) हे दिवसाचे शेवटचे षटक होते आणि तू असे का करत आहेस?”

“यानंतर मला समजले की, त्यावेळी त्यांना नक्की काय म्हणायचे होते,” असेही अय्यर म्हणाला.

अय्यरने मर्यादित षटकांच्या भारतीय संघात चौथ्या क्रमांकावरील आपले स्थान पक्के केले आहे. परंतु एक फलंदाज म्हणून परिपक्व होण्यापूर्वी कधी कधी अतिशय निष्काळीपणे खेळत असे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-हे आहे जगातील ५ महान क्रिकेटपटू, यात दोन आहेत भारतीय

-धोनीला स्थान न मिळालेल्या या संघात दोन भारतीयांचा समावेश

-या कारणामुळे वर्ल्डकप फायनलला धोनी आला होता युवराज आधी

You might also like