वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना (WIvENG) मंगळवारी (८ मार्च) अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा सलामीवीर ऍलेक्स लीज या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करत आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जॉनी बेअरस्टोने लीजला पदार्पणाची कॅप दिली. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही मालिका ‘रिचर्ड्स-बॉथम ट्रॉफी’ या नावाने खेळवली जात आहे. मात्र, पदार्पणाच्या सामन्यात लीज काही विशेष करू शकला नाही आणि केवळ ४ धावा करून बाद झाला.
An England debut confirmed for Alex Lees 🧢#WTC23 | #WIvENG | https://t.co/TJUakpjD3M pic.twitter.com/B2i7fBFG7R
— ICC (@ICC) March 8, 2022
सध्या २८ वर्षाचा असलेला लीज काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डरहॅमसाठी खेळतो. त्याने झॅक क्राऊलीच्या साथीने इंग्लंडसाठी सराव सामन्यात ६५ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून कसोटी पदार्पण करणारा लीज हा ७०१ वा क्रिकेटपटू आहे. त्याने 2013 मध्ये यॉर्कशायरकडून खेळताना डर्बीशायरविरुद्ध २७५ धावांची नाबाद खेळी खेळली होती. २०१२ मध्ये अँड्र्यू स्ट्रॉसच्या निवृत्तीनंतर इंग्लंडसाठी पदार्पण करणारा लीज हा इंग्लंडचा २२ वा सलामीवीर आहे. गेल्या ३२ सामन्यांमध्ये लीजची सरासरी ३० पेक्षा जास्त आहे.
जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ऍशेस मालिका ०-४ ने गमावल्यानंतर इंग्लंडची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी १६ ते २० मार्च या कालावधीत बार्बाडोस येथे खेळवली जाईल. तर, तिसरी आणि अंतिम कसोटी २४ ते २८ मार्च दरम्यान ग्रेनाडा येथील नॅशनल स्टेडियमवर खेळली जाईल. याआधी दोन्ही संघांनी पाच सामन्यांची टी२० मालिकाही खेळली आहे. इंग्लंडच्या संघाने वेस्ट इंडिजमध्ये गेल्या ५४ वर्षांत केवळ एकदाच मालिका जिंकली आहे.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ-
ऍलेक्स लीज, झॅक क्राऊली, जो रूट (कर्णधार), डॅनियल लॉरेन्स, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, क्रेग ओव्हरटन, मार्क वुड, जॅक लीच.
महत्वाच्या बातम्या-
इंजीच्या पुतण्याने कांगारुंना चोप चोप चोपलं, पहिल्याच कसोटीत रचले मोठे विक्रम (mahasports.in)
जर्मन ओपन स्पर्धेत सिंधू-श्रीकांतचा विजयाने श्रीगणेशा; लक्ष सेनवरही राहणार नजर (mahasports.in)