विश्वचषक 2023 स्पर्धेत सर्वात चांगले प्रदर्शन करणारा संघ म्हणजे भारतीय संघ होय. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारताने साखळी फेरीतील 9 आणि 1 उपांत्य सामना असे मिळून 10 पैकी 10 सामने जिंकले आहेत. उपांत्य सामन्यात भारताने दमदार प्रदर्शन करत न्यूझीलंडला 70 धावांनी पराभवाचा धक्का दिला. तसेच, अंतिम सामन्यात दिमाखात एन्ट्री केली. या सामन्यात विजय मिळाल्यानंतर भारतीय खेळाडू खूपच भावूक झाले. खेळाडूंनी एकमेकांची गळाभेट घेत विजयासाठी अभिनंदन केले. यादरम्यान अनेक खेळाडूंना कॅमेऱ्यापुढे अश्रू लपवता आले नाहीत. आता यादरम्यानचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रोहितने विराटची घेतली गळाभेट
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या बाँडिंगने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यापूर्वी दोघे कधीही अशाप्रकारे एकत्र दिसले नव्हते. मैदानापासून ते ड्रेसिंग रूमपर्यंत रोहित आणि विराट खांद्याला खांदा लावून संघासाठी लढताना दिसले. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विजय मिळाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहितने विराटची छाती थोपटत अंतिम सामन्यात पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले.
अश्विनने घेतले शमीच्या हाताचे चुंबन
न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात चेंडूतून आग ओकणारा भारतीय म्हणजे मोहम्मद शमी (Mohammed Shami) होय. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना आपला चाहता बनवले. प्रत्येकजण त्याचे कौतुक करताना थकत नाहीये. त्याने या सामन्यात 9.5 षटके गोलंदाजी करताना 57 धावा खर्चत 7 विकेट्स नावावर केल्या. त्याने या स्पर्धेत 3 वेळा 5 विकेट्स घेण्याचा कारनामाही केला. शमीच्या हातातून निघालेला चेंडू फलंदाजाला खेळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अश्विननने ड्रेसिंग रूममध्ये शमीच्या हाताचे चुंबन घेतले आणि त्याच्या शानदार प्रदर्शनासाठी त्याचे अभिनंदनही केले. यावेळी शमी म्हणाला की, “उत्तर देऊन आलोय मी.”
https://twitter.com/BCCI/status/1725035653086556286?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1725035653086556286%7Ctwgr%5Ea65beabf633a96b0be8f4a3ad876da57ed21471e%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket-news%2Findian-players-got-emotional-after-reaching-final-of-world-cup-2023-video-goes-viral%2F
श्रेयस अय्यर भावूक
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धावा करताना संघर्ष करत होता. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्याची मागणी केली जात होती. मात्र, कर्णधार आणि प्रशिक्षकांनी त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला. हाच विश्वास त्याने सार्थ ठरवला. त्याने उपांत्य सामन्यात सलग दुसरे शतक झळकावले. त्याने 70 चेंडूत 105 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. त्याच्या खेळीमुळे संघाने मोठी धावसंख्या उभारली आणि नंतर सामनाही नावावर केला. या विजयानंतर अय्यर भावूक झाला. त्याच्या भावना व्हिडिओत स्पष्टपणे दिसल्या. (emotional scenes in india dressing room after victory in semi final mohammed shami ravichandran ashwin chemistry odi wc 2023)
हेही वाचा-
टीम इंडियाला मिळणार नवे कोच? वर्ल्डकप जिंकला तरी होणार द्रविड यांचे पॅकअप?
INDvsNZ Semi Final: श्रेयसच्या शतकानंतर रोहितने खास अंदाजात केली नक्कल, व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू