विश्वचषक 2023 स्पर्धेत शनिवारी (21 ऑक्टोबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात श्रीलंका व नेदरलँड्स आमने-सामने आले. श्रीलंकेचा गोलंदाजांनी सुरुवातीला शानदार गोलंदाजी करत नेदरलँड्सला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर नेदरलँडच्या फलंदाजांनी सातव्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली.
मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून उलटफेर करणाऱ्या नेदरलँड्स संघासाठी या सामन्यात सुरुवात चांगली झाली. नेदरलँड्सचे सहा फलंदाज केवळ 91 धावात माघारी परतल्याने संघ अडचणीत सापडला होता. अनुभवी सायब्रंड एंजेलब्रेच व अष्टपैलू लोगन वॅन बीक यांनी श्रीलंकेचा गोलंदाजांचा यशस्वी सामना केला. या जोडीने सातव्या गड्यासाठी 135 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला संकटातून बाहेर काढले. एंजेलब्रेच याने 82 चेंडूंमध्ये 70 धावा करताना चार चौकार व एक षटकार खेचला. तर दुसऱ्या बाजूने बीक याने याने अत्यंत संयमाने फलंदाजी करत 75 चेंडूत 59 धावांचे योगदान दिले. यासह नेदरलँड्सने 262 धावा धावफलकावर लावल्या.
एंजेलब्रेच व बीक या जोडीने 135 धावांची भागीदारी करताना विश्वचषकातील ऐतिहासिक भागीदारी नोंदवली. विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात सातव्या गड्यासाठी झालेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे.
श्रीलंका संघासाठी या सामन्यात दिलशान मधुशंका व कसून रजिथा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. या धावांच्या प्रतिउत्तरात श्रीलंकेने दोन बाद 100 अशी आश्वासक सुरुवात केली होती.
(Engelbrecht and Beek 135 runs historic partnership vs srilanka in odi World Cup)
हेही वाचा-
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! कॅप्टन बावुमा संघातून बाहेर, ‘हे’ आहे कारण
वानखेडेत ENG vs SA महामुकाबला! Toss जिंकत बटलरचा बॉलिंगचा निर्णय; एक दिग्गज In, तर दुसरा Out