लंडन । यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो आणि फिरकीपटू गोलंदाज व अष्टपैलू मोईन अली यांना गुरूवारी (९ जुलै) आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडच्या २४ सदस्यीय प्रशिक्षण संघात (ट्रेनिंग ग्रुप) सामील केले आहे.
साऊथँम्पटनच्या एजस बाऊलमध्ये ३० जुलै, १ ऑगस्ट आणि ४ ऑगस्ट या ३ दिवशी इंग्लंड आयर्लंडविरुद्ध बंद दारामागे म्हणजेच प्रेक्षकांविना वनडे सामने खेळणार आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी ओएन मॉर्गन इंग्लंड संघाचे नेतृत्व करेल.
मागील आठवड्यात बेयरस्टो आणि अलीला इंग्लंडच्या १३ सदस्य असलेल्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. जे वेस्ट इंडिजविरुद्ध जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात पहिला कसोटी सामना खेळत आहेत. वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन दुखापतग्रस्त झाल्यामुळे या मालिकेत सहभागी होणार नाही. नुकतीच त्याच्या हाताची शस्त्रक्रिया झाली आहे.
अनेक युवा खेळाडूंना दिली संधी
ट्रेनिंग ग्रुपमध्ये यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्स, अष्टपैलू डेव्हिड विली, लियम डॉसन, लियम लिविंगस्टन, जेम्स विंस, बेन डकेट आणि रीस टॉप्ले यांचा समावेश आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने म्हटले, “हा संघ ३० जुलैपासून सुरु होणाऱ्या रॉयल लंडन मालिकेपूर्वी गुरुवारपासून (१६ जुलै) एजस बाऊलमध्ये शिबिरात भाग घेणार आहे. यानुसार, हा संघ मर्यादित षटकांच्या संघ व्यवस्थापनाबरोबर एजस बाऊलमध्ये राहील आणि तो तयारी आणि प्रशिक्षण घेईल.”
या संघादरम्यान २१ आणि २४ जुलै रोजी २ सराव सामने खेळले जातील. त्यानंतर इंग्लड संघाची आयर्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यांसाठी अंतिम घोषणा केली जाईल.
ईसीबीने (England and Wales Cricket Board) याबरोबरच या मालिकेसाठी सपोर्ट स्टाफचीही घोषणा केली आहे. इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड या मालिकेसाठी अस्थायी दृष्ट्या मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांची जागा घेतील. या मालिकेसाठी फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका मार्कस ट्रेस्कॉथिक निभावतील, तर इंग्लंड यंग लायन्सेच प्रशिक्षक जॉन लुईस वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक असतील. त्याचबरोबर डर्हमचे नील किलेन त्यांची साथ देतील.
दक्षिण आफ्रिकेचे फिरकीपटू क्लॉड हेंडरसन यांना फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आले आहे, तर ऍसेक्सचे माजी यष्टीरक्षक जेम्स फॉस्टर हे यष्टीरक्षकांबरोबर काम करताना दिसणार आहेत.
अशाप्रकारे आहे इंग्लंडचा वनडे ट्रेनिंग ग्रूप
ओएन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, टॉम बेंटन, सॅम बिलिंग्स, हेन्री ब्रूक्स, ब्रायडन कार्स, टॉम करन, लियम डॉसन, बेन डकेट, लॉरी इवान्स, रिचर्ड ग्लीसन, लुईस ग्रेगरी, सॅम हेन, टॉम हेम, लियम लिविंगस्टन, साकिब महमूद, मॅथ्यू पार्किन्सन, आदिल रशीद, जेसन रॉय, फिल सॉल्ट, रीस टॉप्ले, जेम्स विन्स, डेव्हिड विली.
ट्रेंडिंग घडामोडी-
-वानखेडेवर २ खुर्च्या आता असणार राखीव, हा व्यक्ती घेऊ शकतो पत्नीसह कोणत्याही मॅचचा आनंद
-असा देवमाणूस; ज्याने भारतीय संघाला शिकवले सामने जिंकण्याचे सायन्स
-बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पडली जसप्रीत बुमराच्या प्रेमात?