चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी इंग्लंड संघ 22 जानेवारीपासून भारताविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदला या मालिकेत सहभागी होण्यासाठी अद्याप भारतीय व्हिसा मिळालेला नाही. साकिब महमूद हा मूळचा पाकिस्तानी आहे. आतापर्यंत त्याने इंग्लंडकडून 2 कसोटी, 9 एकदिवसीय आणि 18 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये साकिबच्या नावावर 38 विकेट्स आहेत. व्हिसा नसल्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सध्या यूएईमध्ये सराव करत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साकिब महमूदला अद्याप भारतीय व्हिसा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत, तो अबू धाबी येथील शिबिरात सामील होऊ शकणार नाही. कारण त्याचा पासपोर्ट व्हिसा प्रक्रियेअंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांकडे आहे. तथापि, संघातील खेळाडूंची पहिली तुकडी कोलकात्याला रवाना होण्यापूर्वी महमूदला व्हिसा मिळण्याची अपेक्षा आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी20 सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. इंग्लंड संघातील पाकिस्तानी वंशाच्या इतर खेळाडू रेहान अहमद आणि आदिल रशीद यांना भारतीय व्हिसा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूला भारतीय व्हिसा मिळण्यास विलंब होण्याची ही पहिलीच वेळ नाही. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज शोएब बशीरला गेल्या वर्षी भारतीय व्हिसा मिळण्यास विलंब झाला होता. विलंबामुळे तो हैदराबादमधील पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. 2023 च्या भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. ख्वाजा देखील पाकिस्तानी वंशाचा आहे.
Saqib Mahmood has been forced to miss a training camp in Abu Dhabi ahead of England’s tour of India due to a delay in securing his visa – a familiar issue for England players with Pakistani heritage
Details: https://t.co/zqKW0fsa9d pic.twitter.com/lOWpmISUbJ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 14, 2025
भारताच्या टी20 मालिकेसाठी इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल. सॉल्ट, मार्क वुड
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल. सॉल्ट, मार्क वुड
हेही वाचा-
भारतीय संघातून वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू गायब? टीम मॅनेजमेंटवर माजी क्रिकेटपटू संतापला
Kho Kho WC 2025: टीम इंडियाचा बॅक टू बॅक विजय, दुसऱ्या सामन्यात ब्राझीलला लोळवलं
टीम इंडियाच्या या खेळाडूंचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन निश्चित, विराट कोहलीही खेळणार?