---Advertisement---

Video: हेलिकॉप्टर कोसळलं! इंग्लिश फलंदाज खेळायला गेला धोनी फेम हेलिकॉप्टर शॉट अन् पडला तोंडघशी

On: सोमवार, मे 17, 2021 11:19 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हेलिकॉप्टर शॉट’चा अविष्कार एमएस धोनीने केला असे म्हटले जाते. त्याला हा शॉट खेळताना पाहण्यासाठी अनेक चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तसेच अनेक फलंदाज हा शॉट खेळण्याचा सराव देखील करत असतात. आयपीएल स्पर्धेत हार्दिक पंड्या आणि राशिद खान यांनी अनेकदा हेलिकॉप्टर शॉट खेळले आहेत. परंतु आता काउंटी क्रिकेटमध्ये देखील फलंदाज हा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात असतात. असाच एक शॉट एसेक्स आणि डर्बीशायर यांच्यात झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

एसेक्स आणि डर्बीशायर यांच्यात झालेल्या सामन्यात एसेक्स संघाने ३ बाद ४१२ धावांचा डोंगर उभारत पहिला डाव घोषित केला होता. एसेक्स संघाकडून डेन लॉरेन्स याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. तसेच त्याने १३३ चेंडू खेळत नाबाद १५२ धावांची खेळी केली होती. यात त्याने १६ चौकार आणि ६ षटकार लगावले होते. लॉरेन्सने मैदानाच्या चारही बाजूला तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु जेव्हा त्याने धोनीचा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तो फसला होता.

जेव्हा लॉरेन्स १५० धावा करण्याचा अगदी जवळ पोहोचला होता तेव्हा त्याने हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गोलंदाजाने त्याला बाहेरच्या दिशेने चेंडू टाकला, ज्यामुळे तो चेंडू बॅटवर योग्यरीत्या आला नाही. त्यामुळे तो शॉट मारता मारता जमिनीवर पडला होता. षटकार मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या लॉरेन्सला त्या चेंडूवर ४ धावा मिळाल्या आणि त्याने १५० धावा पूर्ण केल्या. परंतु हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा फसलेल्या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://twitter.com/1tip1hand/status/1393453172279160835?s=20

डेन लॉरेन्सची कारकीर्द 
डेन लॉरेन्सने जानेवारी २०२१ मध्ये इंग्लंड संघासाठी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत एकूण ५ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला २४८ धावा करण्यात यश आले आहे. यात त्याला २ अर्धशतक करण्यात यश आले आहे. तर त्याने ८५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याला ४६७७ धावा करण्यात यश आले आहे. यात त्याने २३ अर्धशतक आणि ११ शतक झळकावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“तुम्ही माझ्याकडेही बोट दाखवू शकता,” चेंडू छेडछाड प्रकरणी माजी ऑसी गोलंदाजी प्रशिक्षकाचे वक्तव्य

कसोटी चॅम्पियनशीप फायनलपुर्वी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, ‘हे’ प्रमुख खेळाडू अजूनही आहेत अनफिट

बुमराह किंवा शमी नव्हे तर ‘हा’ टी२० क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, विरेंद्र सेहवागने सांगितले नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---