इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. यामध्ये इंग्लंडने भारतीय संघाला एक डाव आणि ७६ धावांनी पराभूत केले. पहिल्या डावात भारतीय संघाने केवळ ७८ धावा केल्या होत्या. तसेच दुसऱ्या डावातही २ बाद २१५ अशा चांगल्या स्थितीत असतानाही पुढे केवळ ६३ धावांत ८ विकेट्स भारतीय संघाने गमावल्या. ज्यामुळे भारतीय फलंदाजांवर सगळीकडून टीका होत आहे. ज्यामध्ये रिषभ पंत याचा देखील समावेश आहे.
गेल्या काही काळापासून भारतीय संघातील भरवशाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि कर्णधार विराट कोहली खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हिरो ठरलेला यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत देखील या दौर्यात काही कमाल करू शकला नाही. त्याने तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात २, तर दुसऱ्या डावात केवळ एकच धावा केली. ज्यामुळे आता त्याच्यावरही चाहत्यांनी टीकास्त्र सोडले आहेत.
यादरम्यान अनेक चाहते संघात बदलाची मागणी करत आहे. अनेक चाहत्यांनी ट्विट करत पंत ऐवजी वृद्धिमान साहाला संघात सामील करण्याची मागणीही केली आहे. अनेकांनी साहाला देखील तेवढीच खेळण्याची संधी मिळावी जेवढी पंतला मिळाली. असे देखील ट्विट केले आहे.
https://twitter.com/puchchiiii/status/1432003442688491524
@SGanguly99 – ask you captain @imVkohli & coach @RaviShastriOfc – to do some changes for good – like
Wriddhiman Saha for Pant
Mayank Aggarwal for Rahul (or we can wait 1 more )
Ashwin for Jadeja or both if possible
Bhubi for Ishant@BCCI #IndvsEng— AB (@lan2in) August 29, 2021
Pant doesn't have the confidence to play swing bowling i think drop him bring in saha #India #Kohli @BCCI
— RampageQ9 (@RampageQ09) August 29, 2021
दरम्यान, या मालिकेत पिछाडीवर असलेल्या इंग्लंड संघाने भारताला नमवत दमदार विजय मिळवला. भारताने तिसरा कसोटी सामना एक डाव आणि ७६ धावांनी गमावला. ज्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पुढील कसोटी सामन्यात संघात मोठे बदल होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढील सामन्यात भारताच्या काही खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो.
तसेच भारतीय संघाची हा सामना गमावल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्य पदाच्या गुणतालिकेत देखील घसरण झाली आहे. या पराभावानंतर भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आला आहे. तर, या पराभावाचा फायदा पाकिस्तानला झाला. ज्यामुळे पाकिस्तानचा संघ टक्केवारीच्या आधारावर सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.
सध्या दोन्ही संघ मालिकेत १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे पुढील उर्वरित २ कसोटी सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. पुढील कसोटी सामना ओवलच्या मैदानात गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरू होणार आहे. यासाठी दोन्ही संघांची जोरदार तयारी चालू आहे.
महत्वाच्या बातम्या –
–आतुरता आयपीएलची! रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनेही धरली युएईची वाट; फोटो व्हायरल
–चौथी कसोटी ओव्हलमध्ये! भारतीय संघाची आणि खेळाडूंची या मैदानावर राहिलीये ‘अशी’ कामगिरी
–भारतीय संघाच्या ‘मिस्ट्री स्पिनर’ने केले आहे ‘या’ चित्रपटात काम