दुबई| कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिकने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी शुक्रवारी(१६ ऑक्टोबर) संघांचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे इंग्लंडचा क्रिकेटपटू ओएन मॉर्गन याला केकेआरचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले आहे. आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून मॉर्गन हा इंग्लंडचा दुसरा खेळाडू आहे.
केविन पीटरसननंतर इंग्लंडचा दुसरा कर्णधार
मागीलवर्षी आपल्या नेतृत्वाखाली मॉर्गनने इंग्लंड क्रिकेट संघाला वनडेचा विश्वचषक जिंकून दिला आहे. आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळवणारा तो इंग्लंडचा दुसरा क्रिकेटपटू आहे. याआधी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने 17 आयपीएल सामन्यांचे नेतृत्व केले होते आणि संघाला 3 विजय मिळवून दिले होते. 14 सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला होता. 2009 मध्ये त्याने रॉयल चालेंजर्स बेंगलोर संघांचे 6 सामन्यासाठी आणि 2014 मध्ये दिल्ली संघांचे 11 सामन्यांसाठी नेतृत्व केले होते.
मॉर्गनच्या कर्णधार म्हणून पहिला सामना झाला मुंबईशी
शुक्रवारी (16 ऑक्टोबर) केकेआरचा सामना मुंबईशी झाला. हा मॉर्गनचा आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता. मात्र या सामन्यात केकेआरला ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.
मुंबई विरुद्धच्या पहिला सामन्यात कोलकाताचे कर्णधार अपयशी
मॉर्गन हा कोलकाताचा ५ वा कर्णधार आहे. याआधी सौरव गांगुली, ब्रेंडन मॅक्यूलम, गौतम गंभीर आणि दिनेश कार्तिक यांनी कोलकाताचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे पाचही जणांनी कोलकाताचा कर्णधार म्हणून मुंबई विरुद्ध खेळलेला पहिला सामना गमावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दिनेश कार्तिक आणि केकेआर संघ, अशी होती गेल्या २ वर्षांतील आकडेवारी
‘वारसा नष्ट करायला एक मिनिट पुरेसा’, कोलकाताच्या नेतृत्व बदलानंतर गंभीरचं ट्विट व्हायरल
कार्तिकप्रमाणेच आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद; पाँटिंग, गंभीरचाही समावेश
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष
कार्तिकप्रमाणेच आयपीएलमध्ये ‘या’ खेळाडूंनी अर्ध्यातच सोडले कर्णधारपद; पाँटिंग, गंभीरचाही समावेश
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’