भारतात क्रिकेटला किती महत्त्व आहे हे आपण जाणताच. क्रिकेट खेळासाठी भारतीय बऱ्याच वेळा आपल्या हातातील काम बाजूला सारुन सामने पाहतात किंवा प्रत्यक्ष मैदानावर जातात. काही क्रिकेट चाहते तर क्रिकेट सामन्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे आपल्या कामाच्या वेळा ठरवतात.
काही चाहत्या आपल्या आवडत्या क्रिकेटरसाठी मैदानात वेगवेगळे फलक घेऊन जातात व त्यांना सपोर्ट करतात. काही चाहते हे महिला क्रिकेटपटूंना पाठींबा द्यायला मैदानात जातात. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूनं एकदा केलेलं Hi अनेक चाहत्यांना घायाळ करते.
परंतु जर एखाद्या क्रिकेटपटून आपल्या चाहतीशीच जर लग्न केले तर?? जरा अवघड वाटते ना?? पण असे झाले आहे. तेही एकदा नाही तर तीन वेळा… तेही भारतीय क्रिकेटपटूंच्याच बाबतीत. या लेखात आपण अशाच जोड्यांची माहिती घेणार आहोत. famous Indian Cricketers who married their Fans.
३. रोहित शर्मा- रितीका सजदेह
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचे लग्न स्पोर्ट्स मॅनेजर असलेल्या रितीका सजदेहबरोबर झाले आहे. क्रिकेटपटूंसोबत खूप चांगले संबंध असलेल्या व्यक्तींमध्ये रितीकाचा समावेश होतो. रितीका लग्नापुर्वी रोहितची स्पोर्ट्स मॅनेजर होती. ती तिच्या चुलत भावाची कंपनी काॅर्नरस्टोन स्पोर्ट्स व इंटरटेनमेंटमध्ये स्पोट्स मॅनेजर म्हणून काम करत होती. तीची हरभजन सिंग, युवराज सिंगबरोबर रोहितबरोबर मैत्री होण्यापुर्वीपासून चांगली ओळख होती. रितीका ही लग्नापुर्वी रोहितची कट्टर चाहती होती.
२. एसएस धोनी- साक्षी सिंग धोनी
भारतात सर्वाधिक चर्चा झालेले व ज्या जोडीवर एक चित्रपट तयार झाला आहे ती अर्थात एमएस धोनी व साक्षी सिंग धोनी. २०१०मध्ये धोनी व साक्षीचे लग्न झाले. २०१५मध्ये त्यांना झिवा नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले.
साक्षी अनेक वेळा मैदानावर संघाला पाठींबा देण्यासाठी हजर असते. तीने हाॅटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतले असून ताज बेंगाॅल वगैरे सारख्या मोठ्या हाॅटेल्समध्ये नोकरीही केली आहे. ती याच हाॅटेलमध्ये एमएस धोनीला पहिल्यांदा भेटली होती. इंटर्नशीपचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी ती धोनीला या हाॅटेलमध्ये भेटली होती. तत्पुर्वी ती धोनीची एक मोठी चाहती होती. धोनीने तिचा नंबर मॅनेजरकडून घेतला होता व जेव्हा धोनीचा तिला मेसेज आला तेव्हा कुणीतरी आपली खेचतंय असे तिला वाटले होते.
१. नवाब पतौडी खान- शर्मिला टागोर
नवाब पतौडी खान नवाब मन्सुर अली खान हे भारताचे सर्वात तरुण कर्णधार झाले होते. त्यांचे शर्मिला टागोर यांच्याशी बराच काळ मैत्री होती. शर्मिला टागोर पतौडी यांचा खेळ पाहण्यासाठी स्टेडियमवर येत असे. त्या त्यांच्या मोठ्या चाहत्या होत्या. १९६९ साली या जोडीने लग्न केले. शर्मिला टागोर जरी मोठ्या अभिनेत्री असल्या तरीही त्या तेवढ्याच मोठ्या क्रिकेटच्या चाहत्या व पतौडींच्या फॅन होत्या.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण