भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या संघासोबत ऑस्ट्रेलियामध्ये आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात जबरदस्त प्रदर्शन करत आहे आणि गुरुवारी (10 नोव्हेंबर) संघाला उपांत्य सामना देखील खेळायचा आहे. असे असले तरी, भारताच्या या प्रदर्शनात पंत मात्र काही खास योगदान देऊ शकला नाही. कारण पाच पैकी चार सामन्यांमध्ये तो प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता. पंतचा एक व्हिडिओ सध्या समोर येत आहे, ज्यामध्ये स्टॅन्ड्समध्ये बसलेले चाहते त्याला उर्वशी रौतेला हिचे नाव घेत त्याला ट्रोल करत आहेत.
बॉलिवुड अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi Rautela) आणि भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्या चर्चा मागच्या काही महिन्यांपासून माध्यमांमध्ये होत आहेत. उर्वशीने अनेकदा पंतचे नाव न घेता त्याच्यावर निशाणा देखील साधल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. पण हे प्रकरण अध्याप मिटण्याचे नाव घेत नाहीये. चाहत्यांच्या डोक्यातून उर्वशी आणि पंत यांच्या चर्चा अजूनही जात नाहीयेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताने टी-20 विश्वचषकात सुपर 12 मधील शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळला आणि जिंकला. पंतसाठी यावर्षीच्या विश्वचषाकतील हा पहिला सामना होता, कारण पहिल्या चारही सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले गेले होते. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत देखील पंत बेंचवर बसलेल्या खेळाडूंच्या जर्सीमध्ये दिसत होता. सीमारेषेच्या जवळून जात असताना एका चाहत्याने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हा प्रयत्न यशस्वी देखील झाला. पंत जवळून चालला असताना हा चाहता त्याला म्हणतो, “भाई उर्वशी बोलवत आहे.” यावर पंतचा पारा चढतो आणि रागाच्या भरात प्रत्युत्तर देखील देतो.
Jaake lele phir 🤣#Rishabpant #UrvashiRautela pic.twitter.com/PGGX1K5kIl
— Antareep Gohain (@antareephere) November 7, 2022
भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक अलकडच्या काही महिन्यांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. याच कारणास्तव संघ व्यवस्थापन पंतच्या जागी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये प्राधान्य देत असल्याचे दिसते. कार्तिकला या विश्वचषकात पहिल्या चार सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली, पण काही खास कामगिरी करू शकला नाही. दुसरीकडे पंत देखील खेळलेल्या एका सामन्यात अवघ्या तीन धावा करून बाद झाला. असात गुरुवारी इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामना खेळताना या दोघांपैकी कुणाला संधी मिळते, हे पाहण्यासारखे असेल. तत्पूर्वी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना बुधवार, 9 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये इंग्लंड-भारत यांच्यात ‘कांटे की टक्कर’! टी20मध्ये इंडियाच भारी, आकडेवारी एकदा पाहाच
सेमीफायनलिस्ट कर्णधारांपैकी पाहा कोण आहे सर्वात फ्लॅाप? रोहित, विलियम्सन, बाबर की बटलर?