रशियातील फिफा विश्वचषक आता अंतिम टप्यात आला आहे. आजपासून स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीचे सामने सुरु होत आहेत.
यामध्ये आज शुक्रवारी (६ जुलै) उपांत्त पूर्व फेरीचा पहिला सामना फ्रान्स वि. उरुग्वे तर दुसरा सामना ब्राझील वि. बेल्जिअम यांच्यात होणार आहे.
शनिवारी (७ जुलै) उपांत्य फेरीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सामन्यात स्वीडन वि. इंग्लंड दुसऱ्या सामन्यात यजमान रशिया वि. क्रोएशिया यांच्यामध्ये फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी घमासान होणार आहे.
आजपासून फिफा विश्वचषक २०१८च्या उपांत्यपुर्व फेरीच्या लढती सुरु…!!!
आज होणारे दोन सामने…!!! pic.twitter.com/d3T9bIXAEj— Maha Sports (@Maha_Sports) July 6, 2018
बाद फेरीत विजय मिळवून उपांत्य पूर्व फेरीत दाखल झालेल्या या आठ संघांमध्ये एक खास योगायोग जुळून आला आहे.
या उपांत्य पूर्व फेरीचे सामने ६ आणि ७ जुलैला होणार आहेत.
उपांत्य पूर्व फेरीत पोहचलेल्या फ्रान्स (France), ब्राझील (Brazil), स्वीडन (Sweden) आणि रशिया (Russia) या संघाच्या इंग्रजी नावात ६ अक्षरे आहेत.
तर वरील संघाविरुद्ध खेळणाऱ्या उरुग्वे (Uruguay), बेल्जिअम (Belgium) , इंग्लंड (England) आणि क्रोएशिया (Croatia) यांच्या इंग्रजी नावात नावात ७ अक्षरे आहेत.
एकून पाहता फिफा विश्वचषक २०१८ चे उपांत्य पूर्व फेरीचे सामने ६ विरुद्ध ७ असे होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
-असा काय विक्रम गोलंदाजीत झालायं ज्याची जगभरात आहे चर्चा!
-विशेष मुलाखत- शिव छत्रपती पुरस्कार मिळाला की कबड्डी कारकीर्दीचं सार्थक झालं असं समजेन- गिरीश इरनक
-विंबल्डनचे चाहते आहात? मग या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात..