---Advertisement---

भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिला-वहिला आंतरराष्ट्रीय सामना पाहिलाय का? बघा हा व्हिडिओ

On: मंगळवार, जानेवारी 11, 2022 6:50 PM
IND vs PAK
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येत असतात, त्यावेळी चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. सध्या हे दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने येत असतात. काही महिन्यांपूर्वी आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला होता. हा या दोन्ही संघांमधील शेवटचा सामना होता. परंतु, अनेकांना या दोन्ही संघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्याबद्दल माहीत नसेल. चला तर या ऐतिहासिक सामन्याबद्दल अधिक माहिती या लेखातून जाणून घेऊया. (first ever international match between India and Pakistan) 

भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दिन (Mohammad Azharuddin) हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकताच त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर भारत – पाकिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी पहिल्या वहिल्या कसोटी सामन्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मोहम्मद अझहरुद्दीन यांनी या ऐतिहासिक सामन्याचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन देखील दिले आहे. त्यांनी लिहिले की, “भारत – पाकिस्तान सामन्याची क्लिप पहिल्यांदाच शेअर करत आहे. १६ ऑक्टोबर १९५२, फिरोजशाह कोटला स्टेडियम. डॉ राजेंद्र प्रसाद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लाला अमरनाथ भारतीय संघाचे कर्णधार होते. तर अब्दुल कारदर पाकिस्तान संघाचे कर्णधार होते. हा सामना भारतीय संघाने १ डाव आणि ७० धावांनी आपल्या नावावर केला होता.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना १६ ते १८ ऑक्टोबर १०५२ रोजी पार पडला होता. या सामन्यात अब्दुल कारदार पाकिस्तान संघाचे कर्णधार होते, तर लाला अमरनाथ यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विजय हजारेच्या ७२ आणि हेमू अधिकारीच्या नाबाद ८१ धावांच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ३७२ धावा केल्या होत्या.

https://www.instagram.com/reel/CYjSGoBFSh6

भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव अवघ्या १५२ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर पाकिस्तान संघाला फॉलोऑन देण्यात आला होता. यावेळी देखील पाकिस्तान संघातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. दुसऱ्या डावात देखील पाकिस्तान संघाला अवघ्या १५० धावा करता आल्या होत्या. हा सामना भारतीय संघाने ७० धावांनी आपल्या नावावर केला होता.

महत्वाच्या बातम्या :

श्रेयस भूषवणार आयपीएल विजेत्या संघाचे कर्णधारपद? कोट्यवधींची बोली लावण्यासाठी फ्रॅंचाईजी तयार

U19 विश्वचषक चार दिवसांवर येऊन ठेपलाय आणि अफगाणिस्तान संघ अजून पोहोचलाच नाही; गंभीर आहे कारण

 हे नक्की पाहा :

द्रविडला 'जॅमी' टोपणनाव पडलं तरी कसं? | Story behind Rahul Dravid Nickname JAMMY

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---