---Advertisement---

‘दादा’चे आयपीएलमधील 5 आवडते युवा खेळाडू कोण? स्वत:च सांगितली नावे

Sourav-Ganguly
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीगचा 16वा हंगाम सुरू होण्यास जवळपास एक महिना राहिला आहे. यापूर्वीच संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच, आजी-माजी खेळाडू त्यांच्या आवडत्या आयपीएलमधील युवा खेळाडूंचीही निवड करत आहेत. अशातच भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने आयपीएल 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी त्याचे आवडत्या 5 खेळाडूंची निवड केली आहे. यादरम्यान त्याने या खेळाडूंची नावेही सांगितली आणि त्यांच्या क्षमतेबद्दल भाष्यही केले.

काय म्हणाला सौरव गांगुली?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला की, “सूर्यकुमार यादव हा भारीच आहे. मात्र, आता तुम्ही त्याला युवा खेळाडू म्हणणार नाहीत. मात्र, युवा खेळाडूंमध्ये टी20 क्रिकेट प्रकारात पृथ्वी शॉ याच्यात खूप प्रतिभा आहे. माझ्या मते रिषभ पंतही.” खरं तर, शॉ हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे, तर पंत कार अपघातानंतर दुखापतीतून सावरण्यावर लक्ष देत आहे.

पुढे बोलताना गांगुली म्हणाला की, “शॉ युवा खेळाडू आहे. तो जग जिंकू शकतो. रिषभ पंत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मी पाहू इच्छितो की, ऋतुराज गायकवाड कशी कामगिरी करतोय. माझ्या मते, हे तीन फलंदाज आहेत.” माजी भारतीय कर्णधार गांगुली हा त्याच्या काळात युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जायचा.

तो म्हणाला की, चाहते उमरान मलिकला आयपीएलमध्ये पाहण्यासाठी येतील. “उमरान मलिक जर फिट झाला, तर चाहत्यांना आनंदी ठेवण्यासाठी त्याच्याकडे गती आहे,” असेही तो पुढे म्हणाला. गांगुलीला पाचवे नाव निवडण्यात संघर्ष करावा लागत होता आणि त्याने शेवटचे नाव शुबमन गिल (Shubman Gill) याचे घेतले.

‘दादा’ या नावाने प्रसिद्ध असलेला गांगुली म्हणाला की, “होय, हे नाव माझ्या डोक्यातूनच गेले होते. मात्र, माझ्या मते माझा पाचवा खेळाडू शुबमन गिल असेल. अशाप्रकारे पृथ्वी शॉ, रिषभ पंत, सूर्या यादीत अव्वलस्थानी आहेत. याव्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड, उमरान मलिक आणि शुबमन गिल आहेत.”

आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी खेळला जाणार आहे. (former cricketer sourav ganguly reveals names of his 5 favourite youngsters to watch in ipl)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारतीय संघात कोणताही उपकर्णधार नको, कारण…’, रवी शास्त्रींनी ठणकावूनच सांगितलं
प्रश्न होता विराट-रोहितबद्दल, पण हरभजनने धोनीचं नाव घेत जिंकली चाहत्यांची मने; तुम्हीही कराल कौतुक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---