शुबमन गिल 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्या वर्षी त्याने एकूण 2,154 धावा केल्या, पण पुढच्या वर्षी त्याच्या फॉर्ममध्ये मोठी घसरण झाली. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच डावांत त्याला केवळ 93 धावा करता आल्या होत्या. आता भारताचा माजी क्रिकेटपटू क्रिस श्रीकांतने गिलवर टीका करत त्याला ‘ओव्हररेटेड’ म्हटले आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेत्रदीपक शैलीत गिलने कसोटी पदार्पण केले. त्या मालिकेत त्याने 6 डावात 51.8 च्या उत्कृष्ट सरासरीने 259 धावा केल्या. मात्र त्यानंतर आशियाबाहेर 18 डावांमध्ये त्याची सरासरी केवळ 17.64 इतकीच राहिली आहे. परिस्थिती अशी आहे की डिसेंबर 2022 नंतर गिलला परदेशी भूमीवर एकदाही 40 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही.
के. श्रीकांत त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला, “माझा नेहमीच विश्वास आहे की शुबमन गिल हा ओव्हररेटेड क्रिकेटर आहे. पण कोणीही माझे ऐकले नाही. तो खरोखरच खूप ओव्हररेटेड क्रिकेटर आहे.” ओव्हररेटेडचा मराठीत अर्थ पहिला तर तो असा खेळाडू आहे, ज्याच्या कामगिरीत काही विशेष नसले तरी त्याला सतत अव्वल खेळाडूंच्या यादीत ठेवले जाते. दीर्घकाळ अपयशी ठरल्यानंतरही गिलला इतक्या संधी का दिल्या जात आहेत. असा प्रश्नही श्रीकांतने टीम इंडियाच्या व्यवस्थापनावर उपस्थित केला.
पुढे बोलताना तो म्हणाला की, अपयशी होऊनही गिलला खूप संधी मिळाल्या आहेत. तर व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादवसारख्या खेळाडूला संधी द्यायला हवी. तो म्हणाला, “जेव्हा गिलला एवढा मोठा पाठिंबा मिळतो तेव्हा लोकांना वाटेल की सूर्यकुमार यादवला आणखी संधी दिली जाऊ शकली असती.” भारतीय अनुभवी श्रीकांतने ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन यांनाही संधी देण्याची विनंती केली.
हेही वाचा-
नशीब चमकलं..! ‘टी20’ आणि ‘कसोटी’नंतर या खेळाडूला ‘वनडे’ संघामध्येही मिळणार स्थान
खराब फॉर्ममधून जाणाऱ्या विराट-रोहितला युवराज सिंगची साथ, म्हणाला ‘माझ्यासाठी कुटुंबासारखे….
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार? जाणून घ्या एका क्लिकवर