---Advertisement---

अंतिम सामन्यात भिडणार केकेआर आणि सीएसकेचे ४ ‘रनवीर’, सगळे आहेत एकाहून एक वरचढं

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 3:06 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाचा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबई येथे खेळला जाईल. या अंतिम सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स व ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स आमने-सामने येतील. या हाय व्होल्टेज सामन्यात अनेक खेळाडूंवर चाहत्यांची नजर असेल. दुबईच्या या मैदानावर हा अंतिम सामना मोठ्या धावसंख्येचा होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. तत्पूर्वी, आपण दोन्ही संघातील सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत.

१) ऋतुराज गायकवाड
चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड संघासाठी या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत १५ सामन्यांमध्ये ६०३ धावा केल्या आहेत. जर त्याने अंतिम सामन्यात २४ धावा केल्या तर तो या हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करेल आणि ऑरेंज कॅप जिंकेल.

२) फाफ डू प्लेसिस
चेन्नईचा फाफ डू प्लेसिस हा या हंगामात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने १५ सामन्यांमध्ये ५४७ धावा केल्या आहेत. संघाला अंतिम फेरीत नेण्यातही त्याने मोलाची कामगिरी बजावली आहे. आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत प्लेसिस सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.

३) शुबमन गिल
कोलकाताचा सलामीवीर शुबमन गिलने चमकदार कामगिरी करताना या हंगामात संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.आतापर्यंत त्याने १६ सामन्यांमध्ये ४२७ धावा केल्या आहेत. क्वालिफायर २ मध्ये दिल्लीविरुद्ध त्याने ४६ धावांची धमाकेदार खेळी खेळली. त्याने अनेक सामन्यांमध्ये संघाला विजयाकडे नेले आहे. अंतिम सामन्यातही संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.

४) राहुल त्रिपाठी
महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीने कोलकातासाठी चांगली कामगिरी करून सर्वांना प्रभावित केले आहे. आकडेवारी पाहिली तर आतापर्यंत त्याने या हंगामात १६ सामन्यांत ३९५ धावा केल्या आहेत. दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर २ मध्ये राहुल त्रिपाठीने षटकार मारून कोलकात्याला विजय मिळवून दिला होता. पुन्हा एकदा संघाच्या आशा त्याच्यावर अवलंबून आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

अंतिम सामन्यात ‘कॅप्टनकूल’ धोनी करणार असा विक्रम, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला

खडतर प्रवासानंतर कोलकात्याची फायनलमध्ये धडक, पण चेन्नईची ‘ही’ आकडेवारी घाम फोडणारी

सीएसके आणि आयपीएल जेतेपदाच्या आड येऊ शकतात केकेआरचे फॉर्मात असलेले ‘हे’ ४ शिलेदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---