Loading...

संपूर्ण वेळापत्रक: ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचे संपूर्ण वेळापत्रक, महाराष्ट्रासाठी साखळी फेरीचे सामने सोपे !

हैद्राबाद । आज ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचे वेळापत्रक घोषित झाले. महाराष्ट्राला साखळी फेरीतुन बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी मोठे कष्ट करावे लागणार नाही असे दिसते.

महाराष्ट्र पुरुष संघाचे साखळी सामने:
स्पर्धेत एकूण ८ ग्रुप असून पुरुषांचा संघ क गटात आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाला ३ सामने खेळावे लागणार आहे. महाराष्ट्राचा सलामीचा सामना १ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जम्मू आणि काश्मीर संघासोबत आहे तर दुसरा सामना २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता गुजरात संघासोबत आहे. त्याच दिवशी शेवटचा साखळी सामना महाराष्ट्र संघ पाँडिचेरीबरोबर संध्याकाळी ५ वाजता खेळेल.

महाराष्ट्र महिला संघाचे साखळी सामने:
महिलांच्या स्पर्धेतही ८ ग्रुप असून साखळी फेरीतून १६ संघ पुढे जाणार आहेत. महाराष्ट्राच्या महिलांचा संघ ड गटात असून या गटात गुजरात, उत्तराखंड आणि ओडिशा हे अन्य संघ आहेत. महिलांचा साखळी फेरीतील पहिला सामना हा १ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता गुजरातबरोबर तर दुसरा सामना त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी उत्तराखंड संघासोबत आहे. साखळी फेरीतील अखेरचा सामना ओडिशा संघासोबत २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आहे.

पुरुषांच्या बाद फेरीचे सामने-
जे १६ संघ बाद फेरीत साखळी फेरीतून प्रवेश करणार आहे त्यातील पुरुषांचे संघ उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने ३ जानेवारीला, उपांत्यपूर्व फेरीचे सामने ४ जानेवारीला, उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने ५ जानेवारी रोजी खेळातील.

महिलांच्या बाद फेरीचे सामने-
जे १६ संघ बाद फेरीत साखळी फेरीतून प्रवेश करणार आहे त्यातील महिलांचे संघ उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व फेरीचे सामने ३ जानेवारीला तर उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने ५ जानेवारी रोजी खेळातील.

हे आहे संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक:

Loading...
You might also like
Loading...