भारताने दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकून आज ९ वर्ष पुर्ण झाले. भारताने २०११पुर्वी १९८३ साली क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.
भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली हा विश्वचषक जिंकला होता. गौतम गंभीरने तिसऱ्या क्रमांकावर या सामन्यात ९७ धावांची खेळी केली होती तर धोनीने ५व्या क्रमांकावर नाबाद ९१ धावांची खेळी केली होती. या दोनही खेळी भारतासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या.
या सामन्यात अनेकांना गौतम गंभीरला सामनावीर पुरस्कार मिळेल असे वाटले होते. परंतु एमएस धोनीला हा सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्यावरुन आजही अनेक वाद क्रिकेटप्रेमी तसेच तज्ञांमध्ये आहेत.
धोनीने या सामन्यात ४९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला होता. ते चित्र आजही कोणताही क्रिकेटप्रेमी विसरला नाही.
आज क्रिकइंफो वेबसाईटने धोनीचा तोच फोटो शेअर करत “२०११ साली याच एका शाॅटने करोडो भारतीयांना आनंद दिला,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
यावर या ट्विटचा स्क्रीनशाॅट घेऊन गंभीरने निशाना साधला आहे. “क्रिकइंफो, तुम्हाला आठवण करुन देतो की हा विश्वचषक संपुर्ण भारताने जिंकला होता. यात सर्व भारतीय खेळाडू व सपोर्ट स्टाफचाही समावेश आहे. बऱ्याच काळापासून तुम्ही केवळ त्या एका षटकारावर अडकून पडला आहात, ” असे गंभीरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/GautamGambhir/status/1245562059309248513
२०११ विश्वचषक विशेष-
–धोनीने ज्या बॅटने षटकार मारत विश्वचषक जिंकला तिला मिळाली भलतीच किंमत
–२०११ विश्वचषक विजयातील केवळ एक हिरो आहे सध्याच्या टीम इंडियाचा सदस्य
–तो षटकार, ते मैदान आणि तो इतिहास….
–आठवण – भारताच्या विश्वविजयाची
–गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार, २०११ ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक
–का झाला होता २०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन वेळा टाॅस?






