आयपीएल 2020 मध्ये चेन्नई सूपर किंग्सने अतिशय खराब कामगिरी केली आहे. या हंगामात खेळलेल्या 13 सामन्यांपैकी या संघाने केवळ 5 सामन्यात विजय मिळवला आहे. 2021 मध्ये आयपीएलची लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावात सीएसके संघात अनेक बदल होईल असा विश्वास माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला आहे. त्याने सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूच्या नावाचीही भविष्यवाणी केली आहे. तो ईएसपीएन क्रिकेइन्फो क्रीडाविषयक वेबसाईटशी बोलत होता.
नव्याने करावी लागेल संघबांधणी
सीएसके संघातील खेळाडूंविषयी बोलताना गंभीर म्हणाला, “सीएसके संघातील जास्तीत जास्त खेळाडू अधिक वयाचे आहेत. त्यामुळे त्यांना नव्याने संघबांधणी करावी लागेल. या संघात बरेच युवा प्रतिभावान खेळाडू देखील आहेत. त्यापैकी आपण फक्त एक किंवा दोन खेळाडूंना मैदानावर खेळताना पाहिलं असेल. परंतू 2021 मधील लिलावानंतर आपल्याला कदाचित पूर्णपणे नवा सीएसके संघ दिसेल.”
सीएसके संघात असेल तरुण खेळाडू
लिलावात तरुण खेळाडूंना स्थान देण्याबाबत बोलताना तो म्हणाला की, “लिलावादरम्यान सीएसके संघ सक्रिय नसतो. हा त्यांचा इतिहास आहे. 2021 मधील लिलावात कदाचित तो सर्वात सक्रिय संघ असेल. मला खात्री आहे ही पुढील हंगामात सीएसके संघात तरुण खेळाडू असतील. काही अनुभवी खेळाडूही असेल. मला वाटत नाही की बऱ्याच वर्षांपासून खेळत असलेले खेळाडू पुढच्या हंगामात सीएसके संघात दिसतील.”
…तो सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असेल
“संघात बरेच बदल होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण संघातील एकमेव महत्वाचा खेळाडू म्हणजे अष्टपैलू सॅम करन. मला निश्चितच त्याचे स्थान संघात कायम ठेवायला आवडेल. कारण तो एक तरुण खेळाडू आहे आणि प्रत्येक वर्षी त्याच्या कामगिरीत सुधारणा होत आहे. तो सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असेल.” असेही पुढे बोलताना तो म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
वैर फक्त मैदानावर! धोनीची दांडी उडवल्यानंतर त्याच्याकडूनच टिप्स घ्यायला गेला चक्रवर्ती, पाहा Video
CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
‘पुढच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा करू शकतो का?’ या प्रश्नावर मॅक्सवेलने दिलं भन्नाट उत्तर
ट्रेंडिंग लेख –
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला




