---Advertisement---

वडील नवाब पतौडींना म्हटले ‘खोटारडे’; म्हणून ‘या’ खेळाडूवर सैफ अली खानचा चढला पारा

On: रविवार, जुलै 19, 2020 9:26 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नवाब पतौडी यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान, इंग्लंडचे माजी फलंदाज जेफ्री बॉयकॉट यांच्या एका विधानामुळे चांगलाच संतापला होता. सैफने मोठा खुलासा करत म्हटले, बॉयकॉट यांनी एकदा त्याच्या वडिलांच्या दृष्टिदोषावर शंका उपस्थित करत वाईट वक्तव्य केले होते.

पतौडी (Mansoor Ali Khan Pataudi) यांनी १९६१ ते १९७५ यादरम्यान भारतीय संघाकडून ४६ कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्यांनी ४० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यांनी १९६७ साली न्यूझीलंड येथे भारतीय संघाला पहिल्या कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला होता. पतौडी यांनी ३४.९१ च्या सरासरीने तब्बल २७९३ धावा केल्या. त्यात ६ शतके आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे.

त्यांनी अधिकतर सामने आपल्या उजव्या डोळ्याशिवाय खेळले. १९६१ साली झालेल्या एका कार अपघातात त्यांनी आपला उजवा डोळा गमावला होता.

एका डोळ्याने कसोटी क्रिकेट खेळणे शक्य नाही

स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत सैफने खुलासा केला, की बॉयकॉटने (Geoffrey Boycott) त्याच्या वडिलांविरुद्ध वाईट वक्तव्य केल्यामुळे त्याला खूप राग आला होता.

“बाॅयकाॅट यांना मी खूप मानायचो. एक दिवस ते मला म्हणाले, ‘मी तुझ्या वडीलांबद्दल ऐकलंय की ते एक डोळा नसताना कसोटी क्रिकेट खेळले आहेत. हे शक्य नाही.’ त्यावर मी म्हणालो, माझे वडील खोटं सांगायचे असं तुम्हाला वाटतं का?, तर त्यावर बाॅयकाॅट हो म्हणाले होते,” असे सैफ अली खान (Saif Ali Khan) म्हणाला.

“मी ही गोष्ट माझ्या वडिलांना सांगितली होती आणि ते त्यावर नाराज झाले होते. ते म्हणाले, ‘मी दोन्ही डोळ्यांंनी खुप चांगला होतो. परंतु मी एका डोळ्यानेही ठीक आहे.’ त्यांच्याकडून ऐकलेली मी ही एकमेव गोष्ट होती,” असेही सैफ पुढे म्हणाला.

४९ वर्षीय सैफने आपल्या वडिलांच्या सावध मनोवृत्तीबद्दल आणि ते क्रिकेटकडे केवळ एक खेळ म्हणून कसे पाहतात याबद्दल देखील सांगितले.

“जर त्यांना दौरा करायचा नसेल, तर ते म्हणायचे मी उपलब्ध नाही. ते म्हणाले, तो फक्त एक खेळ आहे आणि ६० च्या दशकात त्यांची क्रिकेटबद्दलची आवड कमी होत होती. कारण त्यांना वाटले की आता खूप क्रिकेट झाले आहे,” असेही आपल्या वडिलांबद्दल बोलताना सैफ म्हणाला.

ट्रेंडिंग घडामोडी-

-६८ वर्षांपूर्वी भारताने केवळ २२३ मिनिटांत दोन वेळा धरला होता तंबूचा रस्ता

-जेव्हा क्रिकेटमध्ये ४ चेंडूत झाल्या होत्या तब्बल ९२ धावा

-कमबॅकसाठी धडपडत असलेले ते दोघे शमीच्या फार्महाऊसवर गुपचुप सराव करुन गेले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---