आयपीएल 2018 मध्ये आता फक्त अंतिम सामना बाकी आहे. असे असतानाच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने आयपीएलमध्ये आॅस्ट्रेलियन संस्कृती दिसते असा दावा केला आहे. तसेच त्याच्या या वक्तव्याला विंडिजचा अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमी सहमती दर्शवली आहे.
स्मिथने आयपीएलच्या दरम्यान एका आॅन स्क्रीन विश्लेषण कार्यक्रमात हे वक्तव्य केले आहे. त्याचे म्हणने आहे की आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक आॅस्ट्रेलियाच्याच खेळाडूंना 11 जणांच्या संघात जास्त संधी देताना दिसत आहेत. मग ते खेळाडू फॉर्ममध्ये नसले तरी त्यांना संधी दिली जात आहे.
याला सॅमीने ट्विट करून सहमती दर्शवली आहे. तो म्हणाला, “स्मिथशी पूर्णपणे मी सहमत आहे. आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक त्यांच्या देशातील खेळाडूंसाठी पक्षपात करतात.”
सध्या आयपीएलमध्ये 4 संघांचे प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक आॅस्ट्रेलियाचे आहेत. यात दिल्ली डेअरडेविल्सचे प्रशिक्षक रिकी पॉन्टीग, किंग्ज इलेव्हन पंजाबचे ब्रॅड हॉज, सनरासझर्स हैद्राबादचे टॉम मुडी आणि राजस्थान रॉयल्सचा मार्गदर्शक शेन वॉर्न आहे.
स्मिथने केलेला दावा मुडी वगळता बाकीच्यांच्या बाबतीत खरा ठरलेला दिसुन आला आहे. कारण दिल्लीच्या बाबतीत ग्लेन मॅक्सवेलला अपयशी ठरत असतानाही बऱ्याच संधी देण्यात आल्या. त्याने 12 सामन्यात 14.08 च्या सरासरीने 169 धावाच केल्या. पण तरीही पॉन्टीगने मॅक्सवेलचे समर्थन केले.
डॉर्सी शॉर्टच्या बाबतीतही राजस्थानकडून असेच झाले. त्यानेही 7 सामन्यात 16.42 च्या सरासरीने 115 धावा केल्या आहेत. तर पंजाबकडूनही अॅरॉन फिंचला अपयशी होत असताना सतत संधी देण्यात आली. त्याने 10 सामन्यात 16.75 च्या सरासरीने 134 धावाच केल्या. तर डेविड मिलरला फक्त 3 सामन्यातच संधी देण्यात आली नाही.
स्मिथच्या या दाव्यावर पंजाबचे प्रशिक्षक ब्रॅड हॉज क्रिकबझला म्हणाले की “मी जिथे आहे तिथून मला कुठलाही पक्षपातीपणा दिसत नाही. ” तसेच ते म्हणाले की जेव्हा दक्षिण आफ्रिकेत त्यांची ग्लोेबल लीग सुरू होईल तेव्हा स्मिथला कळेल की तो चुकीचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–१८ वर्षापूर्वी गांगुली आणि द्रविडने रचला होता हा ‘दादा’ विक्रम
–राशिद खान अफगाणिस्तानचा हिरो आहे, आम्ही त्याला भारताला देणार नाही!
–मोठा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर
–कोणते संघ किती वेळा गेले आहेत आयपीएल फायनलमध्ये?
–जे आयपीएल २०१७मध्ये झालं तेच २०१८मध्ये होणार का?
–बापरे! कालच्या सामन्यानंतर एवढं कौतुक आलं राशीदच्या वाट्याला