---Advertisement---

भारताची ही महिला क्रिकेटपटू रचणार इतिहास; पुरुषांच्या वनडेत बजावणार रेफरीची भूमिका

---Advertisement---

भारताची माजी महिला क्रिकेटपटू जीएस लक्ष्मीने (GS Laxmi) आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला आहे. 8 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या तिसर्‍या आयसीसी पुरूष क्रिकेट विश्वचषक लीग 2 च्या पहिल्या सामन्यात ती रेफरी म्हणून काम करणार आहे.

त्यामुळे पुरुषांच्या वनडे सामन्यात सामना रेफरी (Referee) म्हणून काम करणारी ती पहिलीच महिला बनेल. आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग शारजाहमध्ये (Sharjah) युएई आणि अमेरिकेविरुद्ध (UAE vs America) सामन्याने सुरू होईल.

2019 मधील जी.एस. लक्ष्मीची ही दुसरी मोठी कामगिरी आहे. ती याचवर्षी मे महिन्यात आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनेलवर नियुक्त होणारी पहिली महिला रेफरी बनली होती.

जी.एस. लक्ष्मीने तिच्या कारकीर्दीत आतापर्यंत 3 महिला वनडे सामने, 16 पुरुष आंतरराष्ट्रीय टी20 सामने आणि 7 महिला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सामना रेफरी म्हणून काम केले आहे.

2008-09 मध्ये देशांतर्गत महिला क्रिकेटमध्ये (Domestic Womens Cricket) ती पहिल्यांदा सामना रेफरी बनली होती.

आयसीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक, पंच आणि रेफरी एड्रियन ग्रिफिथ (Adrian Griffith) यांनी या कामगिरीबद्दल जीएस लक्ष्मीचे अभिनंदन केले.

या कामगिरीनंतर जी.एस. लक्ष्मीने आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले की, मला क्रिकेटपटू व्हायचे नव्हते.

“मी अभ्यासामध्ये खूपच कमकुवत होते. मला गुणवत्तेच्या आधारे महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. मला विचारले गेले की तुमच्याकडे आणखी काही कौशल्ये आहेत का? मी सांगितले की मी माझ्या भावांबरोबर क्रिकेट खेळते,” असे लक्ष्मीने तिच्या मुलाखतीत सांगितले.

“माझ्यात गोलंदाजीचे चांगले कौशल्ये असल्यामुळे मला स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेश मिळाला,” असेही लक्ष्मीेने सांगितले.

लक्ष्मीने 18 वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळले आणि निवृत्ती घेतल्यानंतर तिने प्रशिक्षण देण्यास सुरू केले. त्यानंतर राज्य स्तरावरील निवड समितीत तिचा समावेश करण्यात आला.

यावेळी, बीसीसीआयने (BCCI) महिलांना सामनाधिकारी म्हणून क्रिकेटशी जोडण्याची नवीन तरतूद केली आणि त्यानंतर लक्ष्मी सामना रेफरीच्या भूमिकेत दिसली.

“मला आठवते जेव्हा बीसीसीआयने मला प्रथम सामना रेफरी म्हणून निवडले होते. माझ्यासाठी हा एक मोठा सन्मान होता. भारतात एक क्रिकेटपटू आणि सामना रेफरी म्हणून माझी मोठी कारकीर्द राहिली आहे,” असे लक्ष्मी म्हणाली.

“आशा आहे की मी येथे खेळाडू आणि रेफरी म्हणून माझ्या अनुभवाचा चांगला उपयोग करेल,” असेही लक्ष्मी म्हणाली.

https://twitter.com/Maha_Sports/status/1203276114283466752

https://twitter.com/Maha_Sports/status/1202955692333621248

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---