इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील २९वा सामना रविवारी (दि. १७ एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सातवाजता उभय संघात नाणेफेक झाली. यावेळी गुजरातने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुजरात आपले विजयी सत्र सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर चेन्नई या सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेतील आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यात गुजरात संघात मोठा बदल झाला आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या या सामन्यात खेळत नाहीये. त्याच्या जागी प्रभारी कर्णधार राशिद खान संघाचे नेतृत्व करताना दिसणारंय. गुजरात संघात आणखी एक बदल म्हणजे, मॅथ्यू वेड बाहेर पडला असून वृद्धिमान साहाची एन्ट्री झालीये. दुसरीकडे चेन्नई संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरणार आहे.
A look at the Playing XI for #GTvCSK#TATAIPL https://t.co/FakN55qi88 pic.twitter.com/rzqkbazpFJ
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स- वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, विजय शंकर, डेविड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान (कर्णधार), अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल आणि मोहम्मद शमी.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
चेन्नई सुपर किंग्स- रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्रावो, ख्रिस जॉर्डन, महीश तीक्षणा आणि मुकेश चौधरी.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अरे कमीत कमी आयपीएल कर्णधारपदाचा तरी राजीनामा दे’, मुंबईच्या सलग ६ पराभवानंतर रोहितवर भडकले चाहते
बेंगलोरविरुद्धचे ‘ते’ षटक दिल्ली कॅपिटल्सला पडले महागात; खुद्द कर्णधाराचा खुलासा
ग्राउंड्समनच्या मुलाला जेव्हा धोनीने दिला मोलाचा सल्ला, ‘ऑफ स्पिनर्सला टी२० मध्ये सर्वच मारतात, पण…’