जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी आता सर्व संघांनी आपली तयारी सुरू केली. त्याबरोबरच आता सट्टा बाजारात देखील आयपीएलसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एका आघाडीच्या अधिकृत बेटिंग वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सध्या गतविजेता गुजरात टायटन्स यात संघावर सर्वाधिक भाव लावला जातोय.
दरवेळी आयपीएल दरम्यान सट्टेबाजांना अटक केल्याची तसेच सट्टेबाजारातील भाव काय आहेत याबाबतच्या बातम्या येत असतात. एका आघाडीच्या बेटिंग वेबसाईट ने नुकतीच आयपीएलच्या जवळपास महिनाभर आधी कोणत्या संघावर किती भाव आहे याची यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार सध्या सट्टा बाजारात गतविजेता गुजरात टायटन्स यांनाच पुन्हा एकदा विजेतेपदाची पसंती दिली गेली आहे. बाजारभावानुसार गुजरातच्या विजयाचा भाव 16.67 असा सांगितला जातोय. दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियन्स यांचा 14.28 बाजारभावासह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत. राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांना देखील प्रत्येकी 13.33 असा भाव मिळताना दिसतोय.
एमएस धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सची यावेळी थेट आठव्या क्रमांकावर घसरण झालीये. त्यांच्यावर 10.00 असा भाव लागलेला दिसतो. आयपीएलच्या दहा संघात सर्वात कमी भाव सनरायझर्स हैदराबादला मिळतोय. त्यांचा भाव केवळ 7.70 इतकाच दिसून येतोय. याचाच सोपा अर्थ म्हणजे गुजरात संघ जिंकल्यास गुंतवलेल्या रकमेच्या सहा पट रक्कम मिळेल. तर, विजयाची सर्वात कमी शक्यता असलेल्या हैदराबादच्या विजयानंतर तब्बल तेरा पट रक्कम देण्यात येईल.
आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला 31मार्चपासून अहमदाबाद येथे सुरुवात होईल. स्पर्धेतील सलामीचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा होणार आहे. तर, अंतिम सामना 28 मे रोजी खेळला जाईल.
(Gujarat Titans Having Lead In Beting And Satta Bazar For IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वरळीचे छपरी! श्रेयस अय्यर आणि रोहित शर्माच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, कॅप्शन वाचाच
ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका! तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसह वनडे संघातून पॅट कमिन्स घेणार माघार?