क्रिकेटविश्वात खूप कमी वेळात अफाट प्रसिद्धी पावलेला खेळाडू म्हणजे इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन. मला नक्की आठवत नाहीय पण मी सहावी-सातवीत शिकत असताना केविन पीटरसनच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा एका सामन्यात पीटरसन आणि युवराजमध्ये काही कारणास्तव भांडण झाल होत. गप्प राहील तो पीटरसन कसला. त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलला केविनने असा काही फटका मारला की संपूर्ण क्रिकेटविश्व त्या फटक्याची चर्चा करू लागला. त्याच फटक्याला आपण अल्टी-पल्टी फटका म्हणून ओळखू लागलो. तेव्हापासून मी तर या खेळाडूचा अक्षरशः मोठा चाहता झालो.
पीटरसनचा जन्म हा आफ्रिकेत झालाय हे खूप कमी लोकांना माहित आहे. क्रिकेटच्या ओढीने तो आफ्रिकेतून इंग्लंडला पोहोचला आणि त्याने आपले आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा स्वप्न साकार केलं.
खूप कमी वेळेत या खेळाडूने अफाट यश आणि नाव कमावलं. आज पीटरसनचे करोडो चाहते पूर्ण जगात आहेत. पीटरसन जरी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी तो वेगवेगळ्या भूमिकेत क्रिकेटशी जोडला गेलेला असतो. वयाच्या चाळीशीत असला तरीही केविन आजही आपल्या खेळीने सामन्याचे चित्र बदलण्याची ताकद ठेवतो.
मी 10वीला असताना इंग्लिशच्या तोंडी परीक्षेत केविन पीटरसनवरच बोललो होतो आणि त्यात मला पैकीच्या पैकी गुण भेटले होते. मंगळवारी (दि. 27 जून) 42वा वाढदिवस साजरा करत असलेला केविन पीटरसन याने 136 एकदिवसीय सामन्यात 4440 धावा केल्या आहेत, तर 104 कसोटी सामन्यात 8181 धावा केल्या आहेत. त्याने 2004 साली झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते.
-सचिन आमुणेकर
महत्वाच्या बातम्या-
अन् त्या खेळीनंतर केपीला संबोधलं गेलं होतं ‘द मोस्ट कम्प्लिट बॅट्समन इन क्रिकेट’
जगात 5000 पेक्षा अधिक क्रिकेटर झाले, पण ‘असे’ दोन विक्रम करणारा डेल स्टेन मात्र एकटाच