राजस्थान रॉयल्स संघाला रविवारी (14 मे) लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने हा सामना 112 धावांनी जिंकून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. संजू सॅमसन याच्या नेतृत्वातील राजस्थान संघाचा डाव अवघ्या 59 धावांवर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. या पराभवानंतर संजू सॅमसन याने केलेल्या वक्तव्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग हा चांगलाच संतापलेला दिसला.
उभय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र, राजस्थान संघ या सामन्यात संघर्ष करू शकला नाही. 173 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 10.3 षटकात 59 धावांवर सर्वबाद झाला. ही या हंगामातील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. या पराभवामुळे राजस्थानचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. या पराभवानंतर बोलताना राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने पावर प्लेमध्ये दोन गडी बाद झाल्यानंतर योजना का बदलली नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले,
“आम्ही संपूर्ण स्पर्धेत असेच खेळत आलो आहोत. आम्हाला पावर प्लेमध्ये अधिकाधिक धावा काढायच्या होत्या. मात्र, दुर्दैवाने असे झाले नाही.”
त्याच्या याच वक्तव्याचा समाचार घेताना हरभजन सिंग याने म्हटले,
“तुम्ही असे उत्तर कसे देऊ शकता? तुम्ही परिस्थिती पाहून खेळत नसाल तर तुमचा उपयोग काय? जे यशस्वी संघ आहेत ते या गोष्टींचा विचार करतात. अशा विचारांमुळे तुमचा संघ केवळ सहभाग नोंदवतो. आता वेळ गेलेली आहे. तुम्ही कितीही म्हणाला आपल्याला आणखी संधी आहे, तर तसे नाही. तुम्ही बॅग भरून निघावे आणि पुढील वर्षीसाठी विचार करावा.”
राजस्थानचा अखेरचा सामना आता पंजाबविरुद्ध शिल्लक आहे. या सामन्यात विजय मिळवला तरी राजस्थान संघ केवळ 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतो.
(Harbhajan Singh Angry On Sanju Samson And Rajasthan Royals Attitude In RCB Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
IPLची एकही ट्रॉफी न जिंकणाऱ्या RCBचा भीमपराक्रम! राजस्थानला हरवत नोंदवला खास विक्रम, चेन्नई मागेच
भारतीय दिग्गजाची संघातून केलेली हाकालपट्टी, ब्लॅकमेल करून साधला फायदा; मैदानावर परतताच ठोकलं द्विशतक