टी20 विश्वचषकात 2022 स्पर्धेत पाकिस्तान आणि इंग्लंड या संघात रविवारी (दि.13 नोव्हेंबर) अंतिम सामना खेळला गेला. या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 5 गडी राखून मात केली. इंग्लंडने नाणेफेक जिंकूण पाकिस्तानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाकिस्ताननेे प्रथम फलंंदाजी करत 8 गड्यांच्या मोबदल्यात 137 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेेल्या इंग्लंड संघानेे 19व्या षटकातच विजय मिळवला. या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या प्रदर्शनावर ताशेरे ओढले.
टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाकडून बाबर आझम (Babar Azam) फलंदाजीसाठी आला होता. मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद हॅरीस लवकर बाद झाल्यावर संघाची जबाबदारी बाबरच्या खांद्यावर होती. त्यानंतर बाबर आझम आणि शान मसूद (Shan Masood) यांनी डाव सावरण्याचा चांगला प्रयत्न केला. मात्र, आदिल रशीद (Adil Rashid) याच्या चेंडूवर त्याच्याच हातात झेल देऊन बाबर बाद झाला. भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने त्याच्या खेळण्याच्या पद्धतीवर तिखट शब्दात टीका केली आहे.
बाबरने आपल्या 28 चेंडूतील 32 धावांच्या डावात फक्त 2 चौकार मारले. आदिलने टाकलेला गुगली चेंडू बाबर समजू शकला नाही. त्याने त्या चेंडूला कट करण्याच्या प्रयत्नात फसला. हा फटका मारण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने तो मारेलला चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातात झेल स्वरुपात गेला.
सामन्यानंतर हरभजन सिंह एका माध्यमाशी बोलताना म्हणाला की, बाबर आपल्या खेळण्याच्या पद्धतीने पाकिस्तान संघाला अडचणीत ढकलत आहे. त्याचबरोबर हरभजनने असेही म्हटले की,” पाकिस्तानी संघाला आज आपल्या फलंदाजीबाबत नाराजी असेल आणि माझ्या नजरेत बाबर आझमने आज अतिसामान्य खेळी केली. तो या संघाचा कर्णधार आहेे आणि त्याच्याकडून अशा सामान्य फलंदाजी प्रदर्शनाची अपेक्षा तुम्ही करु शकत नाही. तो या संघाला एका खूप मोठ्या अडचणीत ढकलतोय. यातून पाकिस्तानी संघाला बाहेर येण्याची गरज आहे.”
टी20 विशएवचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय मिळवत विश्वविजेतेपद मिळवले. या सामन्यात 3 गडी बाद करणाऱ्या इंग्लंडचा गोलंदाज सॅम करन याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. एकाचवेळी एकदिवसीय आणि टी20 विश्वविजेतेपद असणारा इंग्लंड हा एकमेव देश आहे. (Harbhajan Singh has criticized Babar Azam for their defeat in World Cup final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला त्याच्याबद्दल आदर नाही’, क्रिस्तियानो रोनाल्डोने मॅनचेस्टर युनायटेडचा बॉस एरिक टेन हॅगला फटकारले
VIDEO: कॅप्टन असावा तर जोस बटलरसारखा! सेलिब्रेशनपूर्वी रशिद, मोईनला केले सतर्क; कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित