---Advertisement---

या मालिकेतून होऊ शकते हार्दिक पंड्याचे टीम इंडियात पुनरागमन

On: बुधवार, डिसेंबर 11, 2019 1:32 PM
---Advertisement---

दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघातून काहीकाळ बाहेर गेलेला अष्टपैलू खेळाडू  हार्दिक पांड्या आता यशस्वी शस्त्रक्रियेनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमनाची तयारी करत आहे. याबद्दल हार्दिक म्हणाला की तो स्वत: ला क्रिकेटपासून दूर ठेवू शकत नाही.

तो म्हणाला की आता मला मैदानात परत येण्यासाठी मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होऊ इच्छित आहे. तसेच तो म्हणाला की त्याला संयम ठेवण्याची गरज आहे.

आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिक म्हणाला, ‘पाठदुखी असूनही मी बराच वेळ खेळत होतो. मी शस्त्रक्रिया न करण्याचा प्रयत्न करत होतो. यासाठी मी शक्य तितके प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. मला वाटत होते की मी माझ्या क्षमतेनुसार चांगली कामगिरी करू शकत नाही.’

तो म्हणाला, ‘मी माझ्या पूर्ण क्षमतेनुसार खेळू शकलो नाही,  त्याचे कारण दुखापत होते. याचा अर्थ असा होतो की मी स्वत: ला आणि माझ्या संघाला न्याय देत नाही. त्यानंतरच मी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.’

तसेच  हार्दिक पुढे म्हणाला, ‘खरं सांगायचं तर मला आता बरं वाटत आहे. आम्ही एक चांगले काम करत आहोत. शस्त्रक्रियेनंतर परत येणे सोपे नाही. म्हणून आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहे. न्यूझीलंड मालिकेपूर्वी मी परत येऊ शकतो.’

भारतीय संघ पुढीलवर्षी जानेवारी महिन्यात 40 दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत टी20, वनडे आणि कसोटी मालिका खेळेल.

भारताकडून 100 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला हार्दिक पुढे म्हणाला, ‘चार-पाच वर्षे खेळत असताना मला असे आढळले आहे की तूम्हाला दुखापतग्रस्त व्हायला आवडत नाही, पण  दुखापत होते. हा खेळाडूच्या जीवनाचा एक भाग आहे. आपल्याला दुखापत होऊ शकत नाही असा दावा आपण करू शकत नाही. त्यामुळे आता मला पुनरागमन करायचं आहे.’

हार्दिक दुखापतीतून पुनरागमन करण्याची ही पहिली वेळ नाही, परंतु यावेळी त्याला मानसिकदृष्ट्या निरोगी रहायचे आहे.

हार्दिक म्हणाला, ‘पुनरागमन करणे सोपे नाही. आपल्या सर्वांना प्रेरणा मिळते, परंतु आपण चुकीच्या मार्गावर जात नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. स्वतःला प्रश्न विचारू नका माझ्या सोबत असं का होत आहे? मी या सर्व गोष्टी मागे ठेवण्याचा आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो.’

‘आता मला समजले आहे की परत येणे माझ्यासाठी योग्य आहे आणि ते मला अधिक मजबूत बनवत आहे.’

‘शारीरिकदृष्ट्या मी परत येऊ शकतो, परंतु मानसिकदृष्ट्या निरोगी असणे महत्वाचे आहे. खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात बर्‍याच गोष्टी घडल्या आहेत आणि मी आता मानसिकदृष्ट्या खूप बळकट झालो आहे. ‘

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---