टी20 विश्वचषकात (T20 World Cup) रविवारी (23 ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेलेला हा सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला. या सामन्यात भारताकडून स्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी भारताच्या विजयात महत्वाची भुमिका निभावली. या सामन्यात विराटबरोबरच हार्दिकनेही मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने पाकिस्तानविरुद्ध चमकदार खेळी केली. सुरूवातीला त्याने गोलंदाजी करताना 4 षटकात 30 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजीत 40 धावांची महत्वाची खेळी केली. याबरोबरच तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये फलंदाजीत 1000 धावांचा आणि गोलंदाजी 50 विकेट्सचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.
हार्दिकने 2016मध्ये भारताकडून टी20मध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 74 सामन्यात 57 विकेट्स आणि 1029 धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच तो पाकिस्तानविरुद्ध तीन वेळा 3 किंवा 3 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
तत्पूर्वी, भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी उत्तम सुरूवात केली. अर्शदीप सिंग याने तर पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना एकेरी धावसंख्येवरच तंबूत पाठवले. पाकिस्तानने इफ्तिखर अहमद आणि शान मसूद यांच्या अर्धशतकी खेळीने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 159 धावा केल्या.
1⃣0⃣0⃣0⃣ T20I runs (& going strong) for Hardik Pandya! 👍 👍
Follow the match▶️ https://t.co/mc9usehEuY #TeamIndia | #T20WorldCup | #INDvPAK pic.twitter.com/B6pzBBRes6
— BCCI (@BCCI) October 23, 2022
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने रोहित-केएल राहुल प्रत्येकी 4-4 धावा करत बाद झाले. त्यामुळे भारत थोडा अडचणीत आला होता, त्याचक्षणी विराट-हार्दिक जोडीने 78 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली. हीच भागीदारी भारताच्या विजयासाठी महत्वाची ठरली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान भिडतो तेव्हा कोहलीच नडतो! पाच विश्वचषकात एकट्या विराटने लढवलाय किल्ला
सव्याज परतफेड! विराटच्या ऐतिहासिक खेळीने मेलबर्नमध्ये पाकिस्तान चारीमुंड्या चित; विश्वचषकात विजयी सुरुवात