---Advertisement---

हार्दिकच्या ‘त्या’ वागण्यामुळे नताशाला अस्वस्थ वाटू लागले होते; दोघांमधील घटस्फोटामागचे कारण आले समोर!

On: रविवार, ऑगस्ट 25, 2024 8:55 PM
hardik natasha
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच (Natasha Stankovic) हिला घटस्फोट दिला आहे. जुलै महिन्यात दोघांनी आपापल्या सोशल मीडियावर विभक्त झाल्याची पुष्टी केली होती. आता या घटस्फोटामागचे कारण समोर आले आहे. एका रिपोर्टनुसार, नताशाने दावा केला आहे की, ती हार्दिकच्या जीवनशैलीशी जुळवून घेऊ शकली नाही. या कारणामुळे तिने हार्दिकपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे.

जेव्हा हार्दिक आणि नताशाने घटस्फोटाची पुष्टी केली होती, तेव्हा दोघांनीही त्यांच्या विभक्त होण्याचे कारण सार्वजनिक केले नव्हते. परंतु एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की नताशा हार्दिकच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळवून घेऊ शकली नाही, कारण हार्दिक ‘स्वतः स्वत:मध्ये खूप गुंग’ होता. नताशाने हार्दिकशी आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु सततच्या प्रयत्नांमुळे ती थकली होती.

नताशाला हार्दिकशी समन्वय साधता येत नव्हता
‘टाईम्स नाऊ’ने एका स्त्रोताचा हवाला देत म्हटले आहे की, हार्दिक खूप मस्तमौला  राहात होता, खूप दिखाऊ वागत होता. नताशाला हे आता सहन होत नव्हते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मोठा फरक असल्याचे तिला जाणवले. तिने त्याच्याशी जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले. नताशाला गती ठेवता येत नव्हती, म्हणून तिने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला.

चार वर्षांचे नाते तुटले
दरम्यान हार्दिक पांड्याने पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबतचे चार वर्षांचे नाते संपवले आहे. सोशल मीडियावर घटस्फोटाची पुष्टी करत दोघांनी लिहिले की, दोघांनीही नाते वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शक्य झाले नाही. शेवटी दोघांनीही एक अवघड निर्णय घ्यायचा ठरवला. घटस्फोटानंतर नताशा तिच्या गावी सर्बियाला गेली आहे. ती तिच्यासोबत मुलगा अगस्त्यलाही घेऊन गेली आहे. तर हार्दिक त्याच्या कुटुंबासोबत भारतात आहे.

हेही वाचा –

बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघातून बाहेर होणार ‘हे’ ३ खेळाडू! आझमचाही समावेश

“माझ्या मुलाला निवृत्तीबद्दल समजले असेल”, निवृत्तीनंतर मुलगा जोरावरबद्दल शिखर धवन भावूक

बाबर आझमचा फ्लॉप शो! बांगलादेशच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयामागची 3 कारणं जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---