आयपीएल 2024 पूर्वी रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची नियुक्ती करण्यात आली, जे रोहितच्या चाहत्यांना आवडलेलं नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात प्रेक्षकांनी हार्दिक विरोधात जोरदार हूटिंग केली. आता पुढील आठवड्यात मुंबई राजस्थान रॉयल्सविरुद्ध घरच्या मैदानावर आपला पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात हार्दिकचा आणखी मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो, असं मत माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीनं व्यक्त केलं आहे.
मनोज तिवारी म्हणाला, “मुंबईत हार्दिकचं स्वागत कसं होतं ते पाहावं लागेल. मला वाटतं इथे त्याची जरा जास्तच हूटिंग केली जाईल, कारण मुंबईचा किंवा रोहित शर्माचा चाहता म्हणून हार्दिकला कर्णधारपद मिळेल अशी अपेक्षा कोणीही केली नव्हती.” मनोज तिवारी पुढे म्हणाला, “रोहितनं मुंबई इंडियन्सला 5 ट्रॉफी दिल्या, तरीही त्याला कर्णधारपद गमवावं लागलं. मला माहित नाही कारण काय आहे, परंतु मला वाटतं की चाहत्यांना हे आवडलेलं नाही. तुम्ही मैदानावर याची प्रतिक्रिया पाहू शकता.”
हार्दिक पांड्या या परिस्थितीला ज्या पद्धतीनं सामोरा गेला ते पाहून मनोज तिवारी प्रभावित झाला आहे. तो म्हणाला, “हार्दिक हूटिंग केलं जात असूनही शांत राहिला. तो नर्व्हस झाला नाही, जे चांगल्या स्वभावाचं लक्षण आहे. हार्दिकला त्याच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करावं लागेल, जेणेकरून तो जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी दावेदारी ठोकू शकेल.
38 वर्षीय मनोज तिवारीनं नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानं 2008 ते 2015 दरम्यान, 12 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 3 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोलायचं झाल्यास, मनोज तिवारीनं 148 सामने खेळले ज्यात त्यानं 47.86 च्या सरासरीनं 10195 धावा केल्या. या दरम्यान त्यानं 30 शतकं आणि 45 अर्धशतकही ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
घरी सांगून आला, “पहिल्या चेंडूवर षटकार मारणार”; मैदानावर येताच करून दाखवलं!
वय 35 अन् चपळता चित्त्यासारखी! अजिंक्य रहाणेनं हवेत उडी मारून घेतलेला ‘हा’ झेल एकदा पाहाच
धोनी इफेक्ट! चेन्नईमध्ये येताच पालटलं शिवम दुबेचं नशीब, आकडेवारी पाहून व्हाल थक्क